रिपाइंने संवर्धिले माणुसकीचे मुल्य !

रिपाइंने संवर्धिले माणुसकीचे मुल्य !
बीड,दि.2(प्रतिनिधी)
सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही भयवाह परिस्थिती लक्षात घेता, संवेदनशील युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्याकडून गेल्या महिना भरापासून शहरातल्या माळीवेस,बारादरी,स्नेहनगर कॉलनी,मोती महल व सटवाई मैदान या भागांमधील आर्थिक, दुर्बल घटकातील कुटुंबीयांना किराणा मालाचे वाटप केले जात आहे. त्या अनुषंगाने शहरातील विविध भागातील गरजूवंताना जिवनावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले. या मदतीचा शनिवारी 37 वा दिवस होता.
सध्या कोरोनामुळे जगासमोर एक मोठे संकट उभा राहिले आहे. त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य लोकांना अधिक बसला आहे. देशात गेल्या मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजगार, उद्योगधंदे, दळणवाहतूक पूर्णपणे बंद आहे. असे झाल्याने लोकांच्या हाताला कामधंदा नाही, म्हणून परिस्थिती आणखीणच बीकट झाली आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टी गांगीर्याने लक्षात घेत, शहरातील विविध भागांमध्ये गेल्या एका महिनाभरापासून युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्याकडून किराणा मालाचे वाटप केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी शहरातील विविध भागातील गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले. या किरणा मालाचे वाटप रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किशन तांगडे, रिपाइंचे युवा शहराध्यक्ष अमर विद्यागर, डॉ.जालिंदर लिंबगावकर, डॉ.प्रांजल लिंबगावकर, निखिल सवाई, शुभम सवाई, प्रदीप भातपुडे, राकेश सवाई, दयानंद ससाणे, संदीप पालके,सागर पालके, सचिन ससाणे, किशोर गायकवाड हस्ते करण्यात आले.








