धारुर पोलिसांनी दलित अत्याचाराच्या घटना दुर्लक्षित केल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार-- डॉ जितेंद्र ओव्हाळ

धारुर पोलिसांनी दलित अत्याचाराच्या घटना दुर्लक्षित केल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार-- डॉ जितेंद्र ओव्हाळ
गुन्हे दाखल करायला उशिर झाल्यास आरोपी अटकेस उशीर
किल्लेधारुर/प्रतिनीधी
गेल्या आठवड्यात दलित अत्याचार वाढत आसताना कार्यवाही करण्यास मुद्दाम चालढकल होत आसल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे
कोरोना सारख्या महामारीत दलित समाज सुरक्षित नाही पोलीस उप अधिक्षक भास्कर सांवत यांच्या शी आपण फोन वर बोलत आसताना आम्ही आमचं बघू असं सागण्यात आलं अत्याचाराच्या घटना घडून दोन दिवस झाल्यानंतर दलित प्रतिबंधक अँक्टनुसार गुन्हे दाखल होत नसल्याने आपण पोलीस आधिक्षक याची भेट घेऊन धारुर पोलीस खात्याची दलित अत्याचार बाबत कारवाई ची मागणी करणार आसल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले संचार बंदी संपल्यानंतर आपण धारुर पोलीस स्टेशन वर विराट मोर्चा काढणार आसल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली या वेळी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायसमुद्रे, धारुर तालुका अध्यक्ष सनि गायसमुद्रे, केज तालुका अध्यक्ष हिराचंद काळे उपस्थित होते








