पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र दिनी एस,  एम,  देशमुख यांच्या " आत्मक्लेश आंदोलनाला " पाठिंबा,  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन -- डॉक्टर गणेश ढवळे

Beed

पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र दिनी एस,  एम,  देशमुख यांच्या " आत्मक्लेश आंदोलनाला " पाठिंबा,  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन -- डॉक्टर गणेश ढवळे
    
बीड ( रिपोर्टर- गोरख मोरे ) 

पत्रकारांनी जीव धोक्यात घालून  कोरोना कालावधीत आपले कर्तव्य बजावत सामाजिक योगदान देताना 122  पत्रकारांचा बळी गेला असून त्यांचे संसार उघड्यावरच पडले असून महाराष्ट्र सरकार त्यांच्या  न्याय मागण्याकडे जाणीव  पूर्वक दुर्लक्ष करत असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला शब्द फिरवला असून पत्रकारा बद्दल अनास्था,   उदासीनता योगदान देणाऱ्या वर्गाची  उपेक्षा असून सामाजिक उपेक्षित वर्गासाठी न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहत अखिल भारतीय मराठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस,  एम,  देशमुख   यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या " आत्मक्लेष आंदोलनाला " पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिल्हाध्यक्ष बीड,  शेख युनूस  भ्रष्टाचार निर्मूलन समिति तालुकाध्यक्ष बीड यांनी महाराष्ट्र दिनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन दिले,  यावेळी सुभाष चौरे,  जिल्हाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद बीड,  सुहास आदोडे ,  पत्रकार हल्ला  विरोधी कृती समिती जिल्हा समन्वयक,  विशाल साळुंके,  विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद,  रमाकांत गायकवाड   सदस्य मराठी पत्रकार परिषद आदि  जन उपस्थित होते . 
    महाराष्ट्रात आज दिनांक 26  एप्रिल 2021  रोजी पर्यंत 122  पत्रकारांचे बळी कर्तव्य  बजावत असताना कोरोना ने गेले असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना फ्रंट वॉरियर  म्हणून डॉक्टर आणि पोलीस यांच्या प्रमाणे कोरोना ने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 50  लाख रुपये देण्याचे वचन हवेतच विरले,  केंद्र शासनाच्या धर्तीवर  कोरोना ने मृत्य  पत्रकारांच्या कुटुंबीयांना 5  लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे ही मागणी सुद्धा मान्य होत नाही,  पत्रकारांसाठी रुग्णालयात राखीव बेड,  ऑक्सिजन आदि  सुसज्ज यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, 18  वर्षा वरील सर्व वयोगटातील पत्रकारांना कोविंड रोग प्रतिबंधात्मक लस द्यावी,  आदि  मागण्या वारंवार निवेदन देऊन सुद्धा  मान्य होत नाहीत,  पत्रकारा बद्दलची उदासीनता त्यातूनच नैराश्य येऊन आत्महत्या सारखे पाऊल उचलण्यात येत आहे या सगळ्या गोष्टीच्या निषेधार्थ  1  मे  2021  रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस,  एम,  देशमुख,  सरांनी सरकारच्या या भूमिकेचा निषेधार्थ " आत्मक्‍लेश आंदोलन " पुकारले असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन केली असून त्या आवाहनाला प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवण्यासाठी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते   शेख युनूस,  यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " आत्मक्लेष आंदोलनाला " परवानगी नाकारल्याने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन दिले . 
    आत्मक्लेश आंदोलनातील मागण्या -- कोरूना ने  मृत्य  पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान तात्काळ देण्यात यावेत,  पत्रकारांसाठी रूग्णालयात राखीव बेड  देण्यात यावा, 18 वर्षा वरील सर्व वयोगटातील पत्रकारांना कोविड  रोग प्रतिबंधात्मक लस द्यावी,  पत्रकारांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी,  आदि  मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

Sharing

Visitor Counter