परळी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर प्रशासनाने त्वरित सुरू करावे-अश्विन मोगरकर

Beed

परळी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर प्रशासनाने त्वरित सुरू करावे-अश्विन मोगरकर

परळी/शेख मुजीब

परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात पन्नास ऑक्सिजन बेड चे कोविड केअर सेंटर गेल्या गुरुवारी 48 तासात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार आरोग्य प्रशासनाने उभारले आहे .यास सात दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे सेंटर सुरु झाले नव्हते..त्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. त्यामुळे परळी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर प्रशासनाने त्वरित सुरू करावे अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे. 
प्राप्त माहितीनुसार ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन होत नसल्याने परळी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर प्रशासनास सुरू करता आले नाही.परळी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना गंभीर स्वरूपाचा कोरोना झाला तर अंबाजोगाई सरकारी दवाखाण्याशिवाय पर्याय नाही. 
पण परळी उपजिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर उभारले असूनही ते गंभीर कोविड रुग्णांसाठी का चालवले जात नाही ? असा प्रश्न येथील भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी उपस्थित केला आहे.डॉक्टर, नर्स व इतर सर्व सोईसुविधा युक्त असलेले येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये मंजुर झालेले कोविड केअर सेंटर कोविड रुग्णांसाठी चालू केले तर खाजगी दवाखान्यातील महागडे उपचार न परवडणाऱ्या परळी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना इथेच त्वरित उपचार मिळतील.तसेच तंत्रज्ञ उपलब्ध असणाऱ्या या उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन सुरू केली तर खिशाला खर्च न परवडणाऱ्या प्रत्येक रुग्णांचे 3-4 हजार रुपयेही वाचतील असे मत व्यक्त करून अश्विन मोगरकर यांनी
परळीत उपजिल्हा रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी मंजूर कोविड उपचार केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे.

 -

Sharing

Visitor Counter