जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठानच्या वतीने परराज्यातील रेल्वे कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Ashti

जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठानच्या वतीने परराज्यातील रेल्वे कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

आष्टी/तुकाराम गणगे.
  बीड प्रसार न्युज. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक मोलमजुरी कामगार, वीट भट्टी कामगार, छोटे-मोठे व्यवसायिक, सामान्य नागरिक यांना उद्योगधंदे, व्यापार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये परराज्यातील मंजुराचाही समावेश आहे. असेच काही बाहेरील राज्यातील मंजूर तालुक्यातील खुंटेफळ - कुंबेफळ शिवारात सुरु असलेल्या रेल्वे कामावर अडकून पडले आहेत, त्यांना जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठान सुंबेवाडी यांच्या वतीने एक महिना पुरेल असे धान्य व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. कसल्याही प्रकारची अन्नधान्याची सोय नसल्या कारणाने परराज्यातून आलेल्या या रेल्वे कामगारांना ज्वारी पन्नास किलो, तांदूळ तीस किलो, तीस किलो गहू, तीन किलो तेल, तीन किलो साखर, शेंगदाणे तीन किलो, मीठ दहा किलो, चहापती सहा पुडे, मिरची पावडर दहा पुडे, कांदे दहा किलो, एक महिना पुरेल असे धान्य व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठानचे योगेश शेळके,दत्तोबा शेळके, सुखदेव साबळे, पांडुरंग शेळके,बाळासाहेब पवार, अमर वाळके उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter