बीड जिल्हा रुग्णालयातील रेमडीसीवीर इंजेक्शन वितरणाचे ऑडिट करा

Beed

बीड जिल्हा रुग्णालयातील रेमडीसीवीर  इंजेक्शन वितरणाचे   ऑडिट करा,  मुख्यमंत्री,  प्रधान सचिवांना तक्रार -- डॉक्टर ढवळे
    
बीड ( रिपोर्टर-- गोरख मोरे ) :

 बीड जिल्हा कोविंड रुग्णालयातील रेमडीसीवीर  वितरण मध्ये मोठ्या प्रमाणात  गैरव्यवहार आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी,  कर्मचारी आणि काही दलालांमार्फत केली जात असून रुग्णांना केवळ कागदोपत्रीच रेमडीसीवीर  इंजेक्शन दिल्याचे तसेच काही  बनावट  रुग्ण दाखवून खाजगी रुग्णालयात दिल्याच्या घटना  घडल्या असून बीड जिल्हा कोवीड  रुग्णालयातील रेमडीसीवीर  वापराचे ऑडिट करण्यात यावे तसेच गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिल्हाध्यक्ष बीड यांनी मुख्यमंत्री,  प्रधान सचिव,  विभागीय आयुक्तांना केली आहे .
    बीड जिल्ह्यात  कोरोना विषाणू संसर्गाचा  रुग्णात दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढ झाल्यानंतर ऑक्सिजन व रेमडीसीवीर  इंजेक्शन तुटवडा  जाणवू लागला ,  अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगाव जम्बो कोविड  रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असतानाच लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयाच्या साडे पाच पट अधिक रेमडीसीवीर  इंजेक्शन जिल्हा रुग्णालयात वापर केल्याची नोंद आहे,  परंतु केवळ कागदोपत्रीच रुग्णाला इंजेक्शन दिल्याची नोंद करून सिव्हिल हॉस्पिटल मधील वरिष्ठ अधिकारी,  कर्मचारी,  भांडार प्रमुख यांनी संगनमताने खाजगी रूग्णालयाला बनवट रुग्णांच्या नावे दिल्याचे उघड झाले असून वरील प्रकरणात डॉक्टर सुखदेव राठोड,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड,  औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे,  आदींचा  यात सहभाग असून 01  एप्रिल 2021  ते 25  एप्रिल 2021  या कालावधीत लोखंडी सावरगाव च्या जम्बो कोवीड  रुग्णालयाला  1290  रेमडीसीवीर  इंजेक्शन पाठवणाऱ्या जिल्हा रुग्णालयाने स्वतःच्या रुग्णालयात मात्र  6994  एवढे इंजेक्शन वापरल्याचे  कागदोपत्रीच दाखवून रेमडीसीवीर  इंजेक्शन काळ्या  बाजारात  विकले असून बीड जिल्हा कोवीड  रुग्णालयातील वापरलेल्या रेमडीसीवीर  इंजेक्शनचे ऑडिट करण्यात यावे . 
    तसेच वार्ड बॉय भरती प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून पात्र उमेदवारांना डावलून आर्थिक  हीत संबंध जोपासत मन मर्जीतील लोकांना पात्रता नसताना भरती करण्यात आली असून त्यांची उच्चस्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करण्यात यावी ,  अशी मागणी केली आहे .

Sharing

Visitor Counter