शासनाच्या दुर्लक्षनामुळे ऐतिहासिक देवस्थान असलेल्या माणिकशाहा बाबांची जागा हडपाण्याचा डाव:- सय्यद सलीम बापू

शासनाच्या दुर्लक्षनामुळे ऐतिहासिक देवस्थान असलेल्या माणिकशाहा बाबांची जागा हडपाण्याचा डाव:- सय्यद सलीम बापू
माजलगाव/प्रतिनिधी
सन १९७९ साली माजलगाव धरणाचे भिंतीचे काम झालेले आहे. सदरील भिंतीचे जागेवर धार्मिक स्थळ नामे हजरत माणिकशहा बाबाची दर्गाह, मस्जीद व चिल्ला बेबीसहाब कब्रस्थान व अशुरखाना होता ज्यावेळी वरील धरणाचे काम चालू करण्यात आले त्यावेळी वरील दर्गाह व कब्रसथान त्या ठिकाणी होते त्याचे पुनर्वसन करून ते दर्गाह, मस्जीद व कब्रस्थान बाबत सर्व्हे नं.८ चिंचगव्हाण येथे ०४ एकर जमीन वरील सर्व साहित्य टाकण्यात आले आहे
ज्यावेळी वरील दर्गाह तोडण्याचे काम चालू होते त्यावेळी मुस्लीम लोकांनी आंदोलन कैलेख सदरचे आंदोलन हे ऐतिहासिक, धार्मिक आंदोलन होते त्यावेळी ६० हजार लोकांना अटक करण्यात आली व त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या जमीनीवर साहित्य टाकल्यानंतर सहा महिने पोलीसांचे संरक्षण होते. त्यावेळी मा.सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते व शरद पवार हे मुख्यमंत्री होते.
सदरील दर्गाह पाडल्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी संपूर्ण रेकॉर्ड तयार करून सर्व्हे नं.८ मध्ये ०४ एकर जमीनीचा ताबा साहित्य टाकून दर्गाहसाठी देण्यात आला परंतू त्यावेळी अदलाबदलीपत्रक करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे सदरील सर्व्हे नं.८ चिंचगव्हाण मध्ये दर्गाह माणिकशहाबाबाचे नाव ७/१२ पत्रकाचे रेकॉर्डला लावण्यात आलेले नाही परंतु संपूर्ण प्रक्रिया करून पुनर्वसन झालेले आहे. याबाबतचे संपूर्ण रेकॉर्ड माजलगाव पोलीस स्टेशन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी बीड, भूमि अभिलेख कार्यालय व तहसिल कार्यालय यांचेकडे व हजरत माणिकशहा बाबा यांच्या दर्गाहमधील त्यांचा सांगाडा व कबर मधील सर्व साहित्य हे मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांचे कार्यालयात आज सुद्धा पेट्यामध्ये बंद करून ठेवलेले आहे. येथील तहसिलदार यांना दिनांक १७/०६/२०१० रोजी मुस्लीम संघर्ष समिती माजलगाव शहर तर्फे निवेदन देण्यात आले होते व सदरचे निवेदन सर्व शासकीय कार्यालयात देण्यात आलेले होते. तसेच त्यानंतर दि.०४/०६/२०११ रोजी कार्यकारी अधिकारी माजलगाव प्रकल्प विभाग क्र.४ केसापुरी वसाहत यांना देखील अर्ज देण्यात आलेले होते. दि२०/०६/२०१५ रोजी भुमि अभिलेख माजलगाव यांना अर्ज देण्यात आला होता. तसेच दि.०४/०८/ २०१७ रोजी तलाठी सज्जा व मंडळ अधिकारी माहिती देण्यात आली होती .
उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव यांना दि. २५/०२/२०२० रोजी नोटीस देणार यांनी अर्ज दिलेला होता. तसेच दि.२८/१२/२०१६ रोजी मा.तहसिलदार तहसिल कार्यालय माजलगांव यांनी त्याबाबत पत्र काढलेले होते. सदरचे पत्र मंडळ अधिकारी व तलाठी यांना काढलेले होते. तसेच वेळोवेळी मी न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहे.
परंतु काही लोकांनी चिंचगव्हाण मधील ०४ एकर जमीनीवर हजरत माणिकशहा बाबा दर्गाचे सामान उद्यस्त करून ते विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात आहेत व तसे काही साहित्यांची विल्हेवाट लावलेली आहे व त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करू पाहत आहेत वेळोवेळी तेथील ग्रामसेवक, सरपंच यांना याबाबत कळविले परंतू त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. सदरील प्रकरण हे धार्मिक जागेच्या विटंबनाबाबत असल्यामुळे व तेथे धार्मिक जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये
येथील ०४ एकर जमीन पुनर्वसनामध्ये हजरत माणिकशहा बाबाची दर्गाह, मस्जीद व चिल्ला बेबीसहाब कब्रस्थान व अशुरखानालाच मिळावी
त्या बाबतची नोंद महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अ.क्र.२४ वर नोंद आहे. वर नमुद वादमिळकतीवर विविध लोक बेकायदेशीररित्या अतिक्रमण करू लागले आहेत व त्यांना सामधीत शासकीय अधिकारी कर्मचारी हे पाठीशी घालीत आहेत. व त्यांच्याशी हातमिळवणी करू पाहत आहे अश्या सर्वांवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी या साठी काही दिवसात आपण मोठं जण आंदोलन उभारणार असल्याचे समाज सेवक दय्यद सलीम बापू यांनी म्हंटले आहे








