शिवसेना उपजिल्हाप्रमुख एजाजशेठ यांच्याकडून कोविड सेंटरसाठी 25 गाद्याची मदत

शिवसेना उपजिल्हाप्रमुख एजाजशेठ यांच्याकडून कोविड सेंटरसाठी 25 गाद्याची मदत
गेवराई/प्रतिनिधी
शहर व तालुक्यात कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून अशा रुग्णाच्या उपचारासाठी शहरातील विविध ठिकाणी कोविड सेंटर कार्यान्वित आहेत. या सेंटरची देखभाल व रुग्णांना अद्यावत सेवा देण्यासाठी रुग्णांची पूर्व तपासणी, सेंटरची स्वच्छता राखण्यासाठी, रुग्णांचे रेकॉर्ड अद्यावत ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून दानशूर नागरिकांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले होते, त्यांच्या या आवाहनाला सामाजिक कार्यकर्ते व्यापारी व नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मदतीचा ओघ सुरू आहे. दरम्यान या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेख एजाजशेठ यांनी कोविड सेंटरवरील रुग्णांसाठी 25 गाद्या तहसीलदार सचिन खाडे यांच्याकडे सुपूर्द केल्या.
गेवराई शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत असून तेथील सुविधा कमी पडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सचिन खाडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले यांनी रुग्णालयातील कोविड रुग्णांना उपचार करण्यासाठी साहित्याची आवश्यकता असल्याचे सांगत दात्यांना अवाहन केले होते.
त्यांच्या या आवाहनाला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेख एजाजशेठ यांनी कोविड सेंटरवरील रुग्णांसाठी 25 गाद्या तहसीलदार सचिन खाडे यांच्याकडे देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक अजित कानगुडे,
ऍड.श्रीनिवास ढाकणे, ऍड.वैद्य,शेख आरेफभाई यांच्यासह आदींची उपस्थिती होती. तर शासन आणि प्रशासनाबरोबरच नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी समजून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून दिलेल्या या साहित्याचा कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळत आहे.








