जिल्हा रुग्णालयातील रेमडीसीवीर गैरव्यवहार प्रकरणी डॉक्टर सुखदेव राठोड , आदिनाथ मुंडे , नितीन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करा , मुख्यमंत्री , गृहमंत्र्यांना निवेदन -- डॉक्टर ढवळे

Beed

जिल्हा रुग्णालयातील रेमडीसीवीर  गैरव्यवहार प्रकरणी डॉक्टर सुखदेव राठोड ,  आदिनाथ मुंडे ,  नितीन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करा ,  मुख्यमंत्री ,  गृहमंत्र्यांना निवेदन -- डॉक्टर ढवळे
   

बीड ( रिपोर्टर- गोरख मोरे ) 

जिल्हा रुग्णालयातील रेमडीसीवीर  मर्जीतील खाजगी हॉस्पिटल ला पाठवून गैरव्यवहार प्रकरणात संबंधित डॉक्टर सुखदेव राठोड ,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक ,  औषधी भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे ,  नितीन चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत ,  गुन्हे दाखल करण्यास जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा अध्यक्ष बीड ,  तसेच शेख युनूस  भ्रष्टाचार निर्मूलन समिति तालुकाध्यक्ष बीड यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री ,  प्रधान सचिव ,  गृहमंत्री ,  आरोग्यमंत्री ,  प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय मुंबई यांना केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे . 
    सामाजिक कार्यकर्ते दिपक थोरात यांनी या प्रकरणात तक्रार केल्यानंतर त्यांना जिवे  मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या ,  संबंधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिपक थोरात यांनी दिनांक  26   एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांच्या दालनासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ,  प्रशासनाने दोषी ची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती . 
   22   हजार रुपये रेमडीसीवीर  इंजेक्शन विक्री प्रकरणात मुख्य सूत्रधाराणा  वाचविण्याचा प्रयत्न -- डॉक्टर ढवळे
    दिनांक  23   एप्रिल रोजी बीड शहरात 22   हजार रुपयांना रेमडीसीवीर  इंजेक्शन बेकायदेशीर रित्या विक्री प्रकरणात तीन आरोपींना अटक केलेली आहे .  परंतु मुख्य सूत्रधार ज्या हॉस्पिटल मधील  रेमडीसीवीर  इंजेक्शन विक्री करण्यात  आले त्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला नसून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करीत असून संबंधित प्रकरणात दोषीवर कारवाई करण्यात यावी ,  अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे .

Sharing

Visitor Counter