नेत्यांची घोषणाबाजी वा-यावर प्रशासनाच्या ढीसाळ नियोजनामुळे मृत्युचे तांडव

नेत्यांची घोषणाबाजी वा-यावर प्रशासनाच्या ढीसाळ नियोजनामुळे मृत्युचे तांडव
बीड/प्रतिनिधी
जगात कोरोनाने दुसऱ्यांदा डोके वर काढले, मागील काळात देशात केंद्र सरकारने काही उपाय योजना करायला हव्या होत्या जसे ऑक्सीजन व औषध निर्मिति वगैरे पण तसे काहीही केलेले नाही शिवाय मोठमोठ्या थापा मारण्यात व निवडणूक रैली करण्यात मग्न असलेली सरकार आज डोक्याला हाथ लावून बसलेली दिसते पण सरकार व नेत्यांच काय जात मरत आहे ते आम जनता हवालदील होऊन उपचारासाठी ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शनासाठी सैरा-वैरा पडत आहे. जिल्हयात आ. सुरेश धस यांचे आक्रमक अवतार बगावयास मिळाले बाकी खासदार, आमदार नेते कुठे गूंगीचे इंजेक्शन घेवून झोपी गेले कोणास ठाऊक अशी खंत लोकसेना पक्ष प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी व्यक्त केली आहे जिल्हाधिकारी साहेब जिल्हयात इंजेक्शन काळ्याबाजारात दलालामार्फ़त विकले जात आहे, आय टी आय मध्ये फॉर्म भरल्या नंतर शासकीय दवाखान्यात इंजेक्शन मिळणार म्हणून नातेवाईकांना तीन तीन दिवस वाट बघावी लागते जर पेशंट सीरियस असला आणि तीन चार दिवस त्याला इंजेक्शन औषध मिळाली नाही तर कशाला जीवंत राहणार हो? शासकीय दवाखान्यामार्फ़त इंजेक्शन पुरवठा का करत नाही परंतु दरदिवशी पेशंटला इंजेक्शन देण्याची व्यवस्था करावी, मंत्री, नेत्यांनी जाहीर केलीली इंजेक्शन किती प्रमाणात आली व जनतेला किती मिळाली ते ही जाहीर करावे नस्ता बोलाची कड़ी आणि बोलाच भात असू नये, हॉस्पिटल प्रशासनावर योग्य नियंत्रण ठेवावे, डॉक्टर-कर्मचारी स्टॉफ वाढवा, वेळाेवेळी बैठका घ्या खाजगी दवाखान्याच्या बिलासाठी जिल्हाधिकारी यांनी दरपत्रक नेमुन दयावे खाजगी हॉस्पिटल मध्ये पेशंटची लूट होऊ नये, अशी मागणी लोकसेना पक्षाच्या वतीने प्रा. इलियास इनामदार यांनी केली आहे.








