जमियत उलमा ए हिंद(अर्शद मदनी ) पटेल 100 बेड कोव्हीड हॉस्पिटलला मान्यता.

Beed

जमियत उलमा ए हिंद(अर्शद मदनी ) पटेल 100 बेड कोव्हीड हॉस्पिटलला मान्यता

डॉ.आनंदगावकर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन.

माजलगाव/प्रतिनिधी

जमियत उलमा ए हिंद 100 बेड कोव्हीड हॉस्पिटलला शासनाने मान्यता दिली आहे.केशवराज मंगल कार्यालय केसापुरी कॅम्प येथे गुरुवार दि 29 रोजी डॉ.प्रकाश आनंदगावकर यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असून यामुळे शासकीय नियमावली नुसार ठरवलेल्या दरात रुग्णांवर उपचार होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मुजम्मिल पटेल यांनी दिली.

संपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मतेवर काम करत असलेली जमियत उलेमा ए हिंद या संघटनेने नेहमीच नैसर्गिक आपत्तीतही जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम केले आहे.गतवर्षीही कोरोना महामारीत संपूर्ण देशात मोहल्ला क्लीनिक सुरू करून सर्व धर्मीय गरीब रुग्णांची सेवा केली आहे.या फाऊंडेशनच्या माध्यमातून सेवाभाव म्हणून संघटनेचे शहराध्यक्ष मुजम्मिल पटेल यांनी केसापुरी कॅम्प येथे केशवराव मंगल कार्यालयात 100 बेड कोव्हीड हॉस्पिटलला शासन मान्यता मिळवली आहे. गुरुवार दि.29 रोजी सकाळी 11 वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत डॉ.आनंदगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.कोरोना नियमाची चौकट पाळत होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक गंमत भंडारी राहणार आहेत.डॉ.यशवंत राजेभोसले,संघटनेचे जिल्हाअध्यक्ष हाफिज जाकिर सिद्दीकी,उपाध्यक्ष फारुख पटेल,संघटक अलिम पटेल यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.दरम्यान या ठिकाणी जनरल 70 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे तर 30 बेड ICU करिता उपलब्ध आहेत.शासकीय ठरलेल्या दरापेक्षाही कमी दरात या ठिकाणी दर आकारण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मुजम्मिल पटेल यांनी दिली.

मोहल्ला क्लीनिकच्या माध्यमातून मुजम्मिल पटेल यांनी केली होती रुग्णांची सेवा.

गतवर्षी कोरोना आजाराच्या धास्तीने अनेक डॉक्टरांनी संसर्गाच्या धास्तीने रुग्णालय बंद ठेवली होती.त्यावेळी मुजम्मिल पटेल यांनी मोहल्ला क्लीनिक सुरू करून निशुल्क रुग्णसेवा केली.या ठिकाणी त्यांनी गोरगरिबांच्या उपचारासाठी अनेक  डॉक्टर उपलब्ध केले होते.त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना कोव्हीड रुग्णालयाची मान्यता दिली आहे.

Sharing

Visitor Counter