हिवरा पिंपरखेड येथील सिंगल फेज सुरु करा-अफसर पठाण

Beed

हिवरा पिंपरखेड येथील सिंगल फेज सुरु करा-अफसर पठाण       

धानोरा-प्रतिनिधी                  

आष्टी तालुक्यातील धानोरा विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या हिवरा पिंपरखेड येथे महावितरण च्या दुर्लक्षा मुळे  गेल्या कित्येक दिवसांपासून सिंगल फेज बंद असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अधिक माहिती अशी की, हिवरा पिंपरखेड येथील नागरिक सततच्या विस्कळीत विद्युत पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत.कोणत्याही वेळी अवेळी विद्युत पुरवठा खंडित केला जातो.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतो.सध्या  कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे लॉक डाउन करण्यात आले. बाहेर पडने जीवावर बेतू शकते या भीतीने सर्व जनता घरातच कैद आहे त्यात उन्हाळ्याची भर पडल्याने  दिवसभर उष्णतेने लोकं वैतागुन गेले आहेत.विशेष म्हणजे सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महीना सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात लहान थोर मंडळी उपवास ठेवतात.महावितरण ने दिवसा सिंगल फेज विद्युत पुरवठा नियमित ठेवून नागरिकांना होणाऱ्या त्रासातुन मुक्ती द्यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अफसर पठाण यांनी केली आहे.

Sharing

Visitor Counter