कोविडमधून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे-नरेश शर्मा
कोविडमधून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे-नरेश शर्मा
बीड/वार्ताहर
देशभरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकांना कोरोना होवून गेलेला आहे. कोरोना झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे जेणेकरून त्यांच्या प्लाझ्मामुळे इतर रूग्णांना मोठ्या प्रमाणात मदत होवू शकते. तसेच 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस घेण्यापूर्वी तरूणांनी रक्तदान करावे असे आवाहन नरेश शर्मा यांनी केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशभरात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढती रूग्णांची संख्या पाहता आरोग्य प्रशासनावर त्याचा मोठा ताण पडू लागला. ज्यांना कोरोना होवून गेला अशांचा प्लाझ्मा इतर रूग्णांवर उपचार करण्यासाठी कामी येत आहे. त्यासाठी कोरोना झालेल्या या तरूणांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे तसेच 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस घेण्यापूर्वी तरूणांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्यासाठी पुढे यावे जेणेकरून आपल्या प्लाझ्मा आणि रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचतील असे नरेश शर्मा यांनी म्हटले आहे.








