तेलगाव ट्रामा सेंटर कार्यान्वित नसतानाच सीसीटीव्ही खरेदीत 10 लाख 17 हजारांचा गैरव्यवहार , विभागीय आयुक्त व मुख्यमंत्र्यांना तक्रार -- डॉक्टर गणेश ढवळे

तेलगाव ट्रामा सेंटर कार्यान्वित नसतानाच सीसीटीव्ही खरेदीत 10 लाख 17 हजारांचा गैरव्यवहार , विभागीय आयुक्त व मुख्यमंत्र्यांना तक्रार -- डॉक्टर गणेश ढवळे
बीड ( रिपोर्टर -- गोरख मोरे )
तेलगाव येथील ट्रामा केअर युनिट कार्यान्वित नसताना व कोरोना रुग्णांचा काहीही संबंध नसताना कागदोपत्रीच 8 सी सी टीव्ही खरेदीत 10 लाख 17 हजार रुपये गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात व ठेकेदार यांच्यावर शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री , विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिल्हाध्यक्ष बीड व शेख युनूस चराटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड यांनी केली आहे .
तेलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील ट्रामा केअर युनिट कार्यान्वित नसतानाच तात्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि तात्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड डॉक्टर अशोक थोरात यांनी ठेकेदारांशी संगणमत करून शासनाने कोरोना कालावधीत केवळ अत्यावश्यक वस्तू चिच खरेदी करण्यात यावी असे आदेश असताना कोरोना रुग्णांचा सबंध नसलेल्या व कार्यान्वित नसलेल्या तेलगाव ट्रामा केअर युनिट येथे सीसीटीव्ही खरेदी केल्याचे कागदोपत्रीच दाखवून 10 लाख 17 हजार रुपयांचा अपहार केला असून संबंधित प्रकरणात उच्चस्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करून दोषीवर शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात यावेत .
दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी जिल्हाधिकारी जगताप यांच्या आदेशावरून धारूरच्या तहसीलदार वंदना शिडोळकर व माजलगाव च्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी तेलगाव ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली व कोवीड सेंटर साठी प्रस्ताव पाठवले , यावरून यापूर्वी तेलगाव ट्रामा केअर सेंटर आणि कोविंड रुग्णांचा यापूर्वी काहीही संबंध नसल्याचे सिद्ध होते . त्यामुळेच वरील प्रकरणात दोषीवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी ,
पालक मंत्री मुंडे साहेबांचे कार्यकर्तेच ठेकेदार म्हणून कारवाईस टाळाटाळ -- डॉक्टर ढवळे
पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच ठेकेदार असल्यामुळेच कार्डियाक रुग्णवाहिका , एम आर आय , सोनू ग्राफी , आदि आवश्यक मशीन रोवर खर्च न करता रंगरंगोटी , विद्युत ई करण , सी सी टीव्ही आदी खरेदीत गैरव्यवहार करून शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करण्यात आली असून पुराव्यासह तक्रारी केल्या नंतर सुद्धा धनंजय मुंडे पालक मंत्री बीड कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत .








