प्रा. रेश्मा महेश निलंगेकर सेट परिक्षेत उत्तीर्ण

प्रा. रेश्मा महेश निलंगेकर सेट परिक्षेत उत्तीर्ण
बीड/प्रतिनिधी
बीड येथील श्री वासुदेवराव निलंगेकर यांच्या स्नुषा व प्रा. डी. एस. कुलकर्णी यांच्या भाचे सुन, सौ. रेश्मा महेश निलंगेकर या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या, सौ रेश्मा महेश निलंगेकर या एस.पी.कॉलेज पुणे येथे हिंदी विषयाच्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रा. रेश्मा निलंगेकर या हिंदी विषयात एम. ए. तसेच हिंदी राष्ट्रभाषा पंडित असून, मागील सहा वर्षांपासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या जपानच्या "ओसाका" विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांस Summer Hindi Intensive Programme अंतर्गत यशस्वीरीत्या मार्गदर्शन करत आहेत. तसेच त्यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांनी आयोजित केलेल्या एशियन विद्यापीठ, जपानच्या विद्यार्थ्यांना 1 महिना हिंदी भाषेचे सखोल मार्गदर्शन केले आहे . याशिवाय आदरणीय गणेश देवी यांनी केलेल्या मराठी बोलीभाषा साहित्याच्या भाषांतर प्रकल्पात सहभाग घेतला आहे. "स्वरणीम राजस्थान" या राजस्थानच्या कला, क्रीडा, साहित्य आणि संस्कृती ची समर्थपणे ओळख करून देणाऱ्या पुस्तकाची सह-संपादिका म्हणून केलेल्या कार्याची नोंद फारच मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेली आहे. याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा सभा, पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या नेहेमी सहभागी असतात. पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी असतात. याशिवाय आदरणीय हरी नारायण व्यास यांच्या सोबत आकाशवाणी पुणे कार्यक्रमात प्रा. सौ. रेश्मा महेश निलंगेकर यांचा सहभाग आहे. याशिवाय निरनिराळ्या मराठी कवितांचे आणि पुस्तकाचे हिंदीत भाषांतर करण्याचे सतत कार्य चालूच असते. तसेच खास वेळ काढून आकर्षक आणि उपयुक्त हस्त कौशल्य आधारित वस्तू तयार करणे अश्या विविध कार्यात प्रा. रेश्मा निलंगेकर कार्यमग्न असतात. त्यांचे विविध क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे.








