सभापती साहेब (पाणी पुरवठा विभाग) सत्कार करून घेतला पण पाण्याचं काय?- शाहनवाज खान

सभापती साहेब (पाणी पुरवठा विभाग) सत्कार करून घेतला पण पाण्याचं काय?- शाहनवाज खान
बीड/प्रतिनिधी
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून पिण्याच्या पाण्याची जनतेला तीव्र पाणीटंचाई भासत आहे आणी यात अजुन भर टाकण्याचा काम वार्ड क्रमांक २० मधील स्वतःला युवा नेता म्हणारा कार्यकर्ता (तु खीच मेरी फोटो) करत आहे.
वार्ड क्रमांक २० मधील जनतेच्या मनाशी खेळनारे लोक याठिकाणी पाहण्यात येत आहे कारण ज्या आशेने सत्कार करण्यात आलं होता त्या आशेवर सत्कार घेणाऱ्यांनी पुर्णतः हा पाने पुसली आहेत कारण जनतेला सत्काराच्या वेळेस बोलायचं की आठ दिवसांआड वार्ड क्रं.२० ला पीण्याचं पाणी येईल पण आज १४ दिवस उलटून गेले तरी पाण्याचं प्रश्न संपुष्टात आलेला नाही परिस्थिती जैसे थे आहे .
यामध्ये समाजसेवक व स्वतःला म्हणणारा युवा नेता यांनी सत्कार व जल्लोष करून घेतलपण तेरा दिवस उलटून गेले तरी सुद्धा पाणी नाही आठ दिवसाआड पाणी देणारे पाणीपुरवठा सभापती व ते फुकट श्रेय घेणारा युवा नेता (तु खीच मेरी फोटो) गेले कुठे ?फक्त आश्वासनच का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना निर्माण होत आहे.
पाणी पुरवठा सभापती यांना स्थानिक नागरिकांनी अनेक पाणीटंचाई चा प्रश्न सांगुन देखील पण त्यांच्या कानावर ऊ रेंगाळत नाही काम करण्याची सभापती यांची मानसिकता दिसुन येत नाही तसेच जणू त्यांना असे वाटत आहे लोकांनी त्यांना निवडून देऊन घोड चुक केली की काय?पाणीटंचाई चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी मागणी वार्ड क्रमांक २० मधील जनता करत आहेत.








