जिल्हा प्रशासनाचा अनागोंदी कारभार! रेमडीसीवीर इंजेक्शन वितरणाचा घोटाळा! प्रशासन सुस्त,रुग्णांचे नातेवाईक त्रस्त !

जिल्हा प्रशासनाचा अनागोंदी कारभार,रेमडीसीवीर इंजेक्शन वितरणाचा घोटाळा ,प्रशासन सुस्त,रुग्णांचे नातेवाईक त्रस्त ! -- डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर
बीड ( रिपोर्टर-- गोरख मोरे )
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जस जशी वाढत आहे , तस तसा रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा वाढत आहे , ते मिळवण्यासाठी नातेवाईकांना सकाळपासून रात्रीपर्यंत ताटकळत रांगेत उभे राहण्याची वेळ आली असून जिल्हाधिकारी , जिल्हा शल्य चिकित्सक आणि औषध निरीक्षक यांचा समन्वय नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल होत असून तालुका स्तरावरच रेमडीसीवीर इंजेक्शन वितरित करण्यात यावे अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिल्हाध्यक्ष बीड यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
बीड जिल्हा रुग्णालयातून उधारीवर म्हणजे परत देण्याच्या अटीवर काल दिनांक 24 एप्रिल शनिवार रोजी , दिनांक 22 एप्रिल , 23 एप्रिल रोजी नोंदणी केलेल्या 160 इंजेक्शनचे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले , त्यासाठी जिल्हा रुग्णालयातील औषध भांडार समोर रांगा सुद्धा लागल्या , मात्र दुकान कुलूप बंद होते , नातेवाईक ताटकळत उभे होते , त्यांच्याकडे " टोकण " असताना सुद्धा विविध तांत्रिक कारणे सांगून अडवणूक केली जात होती , यावेळी रुग्णांच्या नातेवाइकाकडून जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल रोष व्यक्त करण्यात आला .
जिल्हाधिकारी- जिल्हा शल्य चिकित्सक- औषध निरीक्षक यांच्यात समन्वयाचा अभाव म्हणून नातेवाइकांचे हाल , सामाजिक , राजकीय कार्यकर्ते नातेवाईकांच्या मदतीला -- डॉक्टर ढवळे
टोकण घेऊन आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडीसीवीर इंजेक्शन वितरित करणे एवढी साधी सरळ प्रक्रिया जिल्हाधिकारी यांचे वेळोवेळी बदलणारे आणि सामान्य माणसाला समजता न येणारे आदेश , जिल्हा शल्य चिकित्सक यांची निष्क्रियता आणि औषध निरीक्षक यांना रुग्ण औषधांचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले , याच वेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय कार्यकर्ते डॉक्टर लक्ष्मण जाधव , हजारी शिवशंकर भोसले , शिवराज बांगर , के के वडमारे , आमदार संदीप शिरसागर यांचे स्वीय सहाय्यक माणिक खाडे , आणि डॉक्टर गणेश ढवळे यांनी डॉक्टर सूर्यकांत गीते जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांना घेराव घातल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवर बोलून रेमडीसीवीर इंजेक्शन वितरित करण्याची तयारी दर्शवली .
तालुकास्तरावर रेमडीसीवीर इंजेक्शन वितरित करण्यात यावे , विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदन -- डॉक्टर ढवळे
बीड जिल्ह्यातील इतर वडवणी , माजलगाव , गेवराई , पाटोदा , आदि तालुक्यातील रुग्णांना जिल्हा प्रशासनाने रेमडीसीवीर इंजेक्शन तालुकास्तरावर तेथील तहसील तथा तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत वितरित करण्यात यावे म्हणजे रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात ताटकळत उभे रहावे लागणार नाही अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना लेखी निवेदनाद्वारे केली असून डॉक्टर सूर्यकांत गीते यांनी या बाबत जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे व या बाबतीत जिल्हाधिकारी तसेच औषध निरीक्षक लेखी आदेश काढून प्रसिद्धी पत्रक काढतील असे सांगितले .








