प्रभाग क्रमांक 20 मध्ये घाणीचे साम्राज्य -ऍड फेरोज शेख 

Beed

प्रभाग क्रमांक 20 मध्ये घाणीचे साम्राज्य -ऍड फेरोज शेख 

बीड/वार्ताहर 

दि.24 मोमीन पुरा बीड येथील प्रभाग क्रं 20 मध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असून सध्या कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग परेशान असून त्यातल्या त्यात लोकांना वायरल इन्फेक्शन  देखील होत आहे परंतु बीड येथील मोमीन पुरा प्रभाग क्रं 20 मधील जनतेच्या आरोग्या शी कोणालाही देणे घेणे नाही प्रभाग क्रं 20 मध्ये मागील दोन ते अडीच महिन्या पासून नाल्यांची साफ सफाई झालेली नाही रस्त्यावर झाडू मारायला देखील कोणी येत नाही नाल्यांची साफ सफाई न झाल्यामुळे इथे डासांनी उच्छाद मांडलेला आहे त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter