धार्मिक यांच्या अर्थपूर्ण सहकार्याने बीड जिल्ह्यातील (दारू) वाईन्स राजरोसपणे चालू

धार्मिक यांच्या अर्थपूर्ण सहकार्याने बीड जिल्ह्यातील (दारू) वाईन्स राजरोसपणे चालू
बाहेरून बंद आतून चालू...
बीड/प्रतिनिधी
दि.24 अत्यावश्यक सेवाच कोरणा काळामध्ये फक्त चालू राहतील, अशा शासनाचा निर्बंध आहे, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळतो अशा बियर बार परमिट रूम, बियर शॉपी, वाईन्स याचा समावेश होतो, ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने फक्त लायसन धारक मद्यपींना पार्सल सुविधा देण्याचं जाहीर केलं होतं, परंतु शासनाच्या या निर्बंधांचे उल्लंघन सर्वच बिअर बार परमिट व वाईन शॉप वाले करताना दिसत आहेत,
कडक लोकडाऊन असताना देखील दारूची विक्री चड्या भावाने तर होतच आहे परंतु पार्सल सुविधा न देता थेट वाईन शॉप बाहेरून बंद आतून चालू प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीचा प्रकार चालू आहे हे फक्त बीड जिल्हा दारूबंदी अधिकारी नितीन धार्मिक यांच्या अर्थपूर्ण सहकार्यामुळे चालू आहे अशी चर्चा सबंध जिल्ह्यात आहे, कसल्याही प्रकारची कार्यवाही हे करताना दिसत नाहीत, अशा भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.








