कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनी अवश्य घ्यावी माजी जि प सभापती युधाजित पंडित यांचे आवाहन

Beed

कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनी अवश्य घ्यावी माजी जि प सभापती युधाजित पंडित यांचे आवाहन

बीड/प्रतिनिधी

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शासनाने ठरवून दिलेले नियम पाळल्यास कोरोनाची संसर्ग साखळी आपण नक्कीच तोडू शकतो. त्यासोबतच या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित असलेली कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनी अवश्य घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे बीड जि प माजी  सभापती युधाजित पंडित यांनी केले आहे.
       गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक 22 एप्रिल रोजी माजी नगरसेविका सौ गिरीकाताई बदामराव पंडित, माजी जि प सभापती युधाजित पंडित आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अनुरुपाताई पंडित यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी सभापती युधाजित पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासन आपल्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न करून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून शासनाने ठरवून दिलेले सर्व नियम पाळावेत. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. शक्यतो अतिमहत्वाचे काम नसल्यास विनाकारण घराबाहेर पडू नये. त्यासोबतच कोरोनापासून आपला आणि आपल्या परिवाराचा बचाव करण्यासाठी सर्वांनी सुरक्षित असलेली कोरोना प्रतिबंधक लस अवश्य घ्यावी असे आवाहन माजी सभापती युधाजित पंडित यांनी केले आहे. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ महादेव चिंचोले डॉ राजेश शिंदे, डॉ सराफ यांच्यासह आरोग्य कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter