चालू वर्षाची घरपट्टी व नळ पट्टी माफ करा -नगरसेवक शेख अमर

चालू वर्षाची घरपट्टी व नळ पट्टी माफ करा -नगरसेवक शेख
अमर
बीड/प्रतिनिधी
बीड शहराची सध्याची स्थिती पाहता बीड शहरातील गोरगरीब रोजंदारी करणाऱ्या रिक्षा चालक बांधकाम मजूर यांना रोजगार नसल्या कारणाने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे .
अश्या लोंकाचा अन्नधान्य व इतर जीवनाश्यक वस्तू साठी संघर्ष सुरु आहे आपण सर्वांनी वस्तुस्थिती बघितली तर अश्या रोंजंदारी करणाऱ्या मजुरांचे व रिक्षा चालकाचे यांचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.
या ष्टकरी कुटुंबावर आज मोठे आर्थिक संकट कोसळले आहे या मुळे त्यांच्यावर उपवास मारीचीं वेळ आली आहे आज कोरोना मुळे गेल्या दीड महिन्यापासून सर्व लोकांचे वेवसाय काम धंदे बंद पडले आहे म्हणून आज आर्थिक परिस्थिती जाणून घेऊन बीड नगरपरिषद चालू वर्षाची घर पट्टी व नळ पट्टी माफ करावी अशी मागणी एमआयएम चे गटनेते तथा नगरसेवक शेख अमर यांनी मुख्यधिकारी/नगराध्यक्ष नगरपरिषद बीड यांच्या कडे केली.
