गोरगरीब उपाशीपोटी असलेल्या गरजुवंतांच्य मदतीला जहागिर मोहा करांची भाकरी

गोरगरीब उपाशीपोटी असलेल्या गरजुवंतांच्य मदतीला जहागिर मोहा करांची भाकरी
भाकरी दिल्याने आम्हा ग्रामीण महिला समाधान वाटले -मीनाक्षी कांदे
किल्ले धारूर/इरफान शेख
धारूर तालुक्यातील जहागीर मोहा येथील ग्रामीण महिलांनी जियो जिंदगी या उपक्रमास प्रतिसाद देत बीड शहरातील गोरगरीब गरजुवंत उपाशी पोटी असलेली नागरिकांसाठी तब्बल 2500 भाकरी दिल्या आहेत त्यामुळे जहागीर मोहा करांची भाकरी आता बीड शहरातील नागरिकांच्या मतदीला धावली आहे
सध्या सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे त्यामुळे शहरातील हजारो गोरगरीब कुटुंब उपाशी आहेत अशा उपाशी कुटुंबांना मदतीसाठी बीड शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यां दादासाहेब मुंडे , धनंजय गुंदेकर, प्रशांत पवार ,दत्तात्रय प्रभाळे एकत्रित येवून जीवो जिंदगी हा उपक्रम सुरू केला यातून बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून भाकरी गोळा केल्या जातात जमा झालेल्या भाकरी शहरातील उपाशीपोटी असलेल्या विविध भागांमध्ये पोहोचवल्या जातात यात भाकरी लोणच सुकी भाजी यांचा समावेश असतो आज बीड शहरामध्ये जवळपास पंधराशे कुटुंब अत्यंत गरीब आहेत ते या भाकरीचे दररोज वाट पाहतात
जहागिर मोहा येथील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई मुंडे यांना हे समजताच त्यांनी जहागिर्मोहा येथून सर्व महिलांना एकत्रित करत अडीच हजार भाकरी गोळा करून त्या जीववो जिंदगी या ग्रुप कडे सुपूर्त केल्या यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश दादा कोकाटे ग्रामसेवक संजय देशमुख,ब्रह्मा शिरसाट , पोलीस पाटील मुक्तताई मंदे,
चेअरमन कलीम शहा, उपसरपंच हनुमंत कोकाटे मधुकर, गोवर्धन कांदे गुंडू कोंबडे, ,निवृत्ती मुंडे, बळीराम कांदे हरिश्चंद्र शिंदे दत्ता मुंडे दत्ता शिंदे ,आप्पा महके, संभाजी मंदे, संभाजी बिल पे सलीम सय्यद शहा, अविनाश कांदे ,गणेश इरमले जाकीर भाई शेख बबन कांदे ,रामेश्वर कसबे इत्यादी उपस्थित होते
आम्ही ग्रामीण भागातील महिला जाहीर मोहा येथून २५०० भाकरी आज जियो जिंदगी या ग्रुप कडे दिल्या आहेत शहरातील गरीब लोक उपाशी राहू नयेत या साठी मी महिलांना आवाहन केले होते ७०० भाकरीची अपेक्षा केली होती पण माझ्या अपेक्षा पेक्षा किती तरी पटीने जास्त भाकरी आज जमा झाल्या गरीब लोकांच्या मदतीला आम्ही धावून गेलोत याचा अभिमान आहे.








