अन्नतंञ महाविद्यालय, आष्टी तर्फे कोव्हिड-१९ जनजागृतीसाठी अॉनलाईन स्पर्धा परिक्षेचे यशस्वी आयोजन- प्राचार्य साईनाथ मोहळकर

अन्नतंञ महाविद्यालय, आष्टी तर्फे कोव्हिड-१९ जनजागृतीसाठी अॉनलाईन स्पर्धा परिक्षेचे यशस्वी आयोजन- प्राचार्य साईनाथ मोहळकर
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज.
जागतिक आरोग्य संघटना (WHO), केंद्र व राज्य शासन यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची माहिती होण्यासाठी आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलीत अन्नतंत्र महाविद्यालय (फुड टेक्नॉलॉजी) मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भीमरावजी धोंडे , अजय (दादा) धोंडे, प्रशाकीय अधिकारी डॉ. डी. बी.राऊत व शिवदास विधाते व प्राचार्य प्रा.साईनाथ मोहळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.पवार एम. पी. यांनी विदयार्थी, प्राध्यापक,पालक यांचेसाठी कोव्हिड-१९ जनजागृतीसाठी अॉनलाईन स्पर्धा परिक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे.या मध्ये कोरोना या विषाणूची माहिती, संसर्ग कसा होतो,काय केले पाहिजे काय नाही इ. संबंधित बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नावली असून ते सोडल्यास महाविद्यायातर्फे ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाते. अद्यापपर्यंत १५० पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक यांनी यशस्विरित्या सहभाग नोंदविला आहे. तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे छायचिञासहित कोव्हिड-१९ जनजागृती माहितीपञक तयार करण्यात आलेले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्री साईनाथ मोहळकर यांनी दिली आहे.








