धारूर शहरात चोरट्यांनी धारेश्र्वर मंदिरातील दान पेटीचे कुलूप तोडले तर तुळजाभवानी मंदिराची दान पेटी केली लंपास

किल्लेधारूर/नाथा ढगे
धारूर येथील कसबा विभागात असलेले जागृत देवस्थान धारेश्र्वर मंदिरातील दान पेटीचे कुलूप तोडून चोरट्यांनी अतील देणगी रक्कम मध्य रात्री चोरली आहे.
या मंदिराच्या जवळ तुळजाभवानी मंदिर आहे या मंदिरातील दान पेटी चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी लंपास केली आहे
येथील नागरिकांनी सांगितले हे धरेश्र्वर मंदिर व तुळजाभवानी मंदिर धारूर परिसरातील नागरिकांचे जागृत देवस्थान म्हणून याची ख्याती आहे या दान पेट्या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून उघडल्या नाहीत भुरट्या चोरी करणाऱ्या चोरांनी चोरीच्या उद्देशाने दान पेटीची चोरी केली आहे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तपास करून चोरांना वर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी येथील नागरिकानी केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे यांनी भेट देवून सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे धारूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.








