कोरोनाच्या या काळामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांकडून गैरव्यवहार शिवसंग्राम खपवून घेणार नाही - सचिन टकले.

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज नेटवर्क
या संकट काळामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांनी गोरगरिबांसाठी आलेलं धान्य नियमाप्रमाणे वाटप करावे, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात धान्य वाटपावर प्रशासनाने नियंञण ठेवावे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा धान्याचा काळाबाजार होणार नाही.
आष्टी तालुक्यात ज्या ज्या गावामध्ये तक्रारी आल्या आहेत त्या दुकानदारांचे परवाने तत्काळ निलंबित करावेत. आता ऊसतोड कामगार ही आपल्या गावी येतं आहेत त्यांचे आलेले धान्य सुद्धा दुकानदार यांनी तात्काळ द्यायला पाहिजे. ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांचे आलेले सर्व रेशन वरील धान्य त्यांना दिले पाहिजे या साठी प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत. या पुढे जर राशन दुकानदार यांच्या विषयी कुठलीही तक्रार आली, गैरव्यवहार केला तर शिवसंग्रामच्या वतीने तुमच्यावर शासनाला कार्यवाही करण्यासाठी भाग पाडू असा इशारा शिवसंग्राम युवक आघाडीचे सचिन टकले यांनी दिला आहे.








