सौ.गंगुबाई गणगे यांचे निधन
Ashti

आष्टी/प्रतिनिधी
गणगेवाडी येथील सौ गंगुबाई जनार्दन गणगे यांचे दि.२३एप्रिल रोजी रात्री ११च्या दरम्यान अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्या काही दिवसांपासून पक्षाघात,मधुमेह या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, दोन मुली, सुना- नातवंडे आहेत.
त्या राज्य राखीव पोलीस बळ गट क्रमांक ७ दौंड येथे कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत गणगे व बीडसांगवी ग्रामपंचायतचे संगणक परिचालक आण्णा गणगे यांच्या आज्जी होत्या.








