युथ क्लब च्या मदतीला धावून आली अंबाजोगाईची मानवलोक संस्था

किल्लेधारुर/नाथा ढगे
मानवलोक संस्था अंबाजोगाई, नेहमीच बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते कोणीही गरजवंत, दीनदलित, शेतकरी असो वा काही सामाजिक कार्य असो मग ते पाणी फाऊंडेशनचे वॉटर कप स्पर्धेमधील कार्य असो किंवा धारूर शहरा मधील तलाव आणि विहिरींचा गाळउपसा आणि खोलीकरण असो यामध्ये नेहमीच मानवलोक संस्थेनेअगदी भरभरून मदत केली आहे किल्ले धारूर युथ क्लब ही धारूर तालुक्यामधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था ,या संस्थेला नेहमीच मानवलोक संस्थेने वेळोवेळी आर्थिक आणि सामाजिक मदत केलेली आहे 2016 मध्ये ज्यावेळेस भीषण दुष्काळ पडला होता त्यावेळेस चिमणीला ही पाणी प्यायला धारूर मधील तळ्यांमध्ये नव्हते अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ हे संकट नसून दुष्काळ ही संधी आहे असे समजून किल्लेधारुर युथ क्लबने तलाव आणि विहिरी मधील गाळ उपसा आणि खोली करणास सुरुवात केली .दिलासा संस्थेसारख्या संस्थेने भरपूर मदत केली परंतु यामुळे हे कार्य पूर्ण होणारे नव्हते त्यामुळे अशा काळातही मानवलोक संस्था अंबाजोगाई चे अनिकेत भैया लोहिया हे मदतीला धावून आले आणि त्यांनी तलावाच्या गाळ उपसा आणि खोली करण्यास मदत केली आजही कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हैराण आहे ,संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरु आहे . सर्वच जग यामुळे त्रस्त आहे अशा परिस्थितीत धारूर शहर ही त्याला अपवाद नव्हते धारूर शहरांमध्ये सुद्धा लॉक डाऊन मुळे अनेकांना बाहेर पडता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये अनेक गोरगरीब, मजूर, शेतकरी यांना खाण्यापिण्याचे संकट निर्माण झाले मग अशा परिस्थितीमध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना काहीतरी देता येईल का असा विचार किल्लेधारुर युथ क्लब संस्था करीत होती आणि प्रश्न निर्माण झाला तर त्याचे उत्तर लगेच लक्षात आले आणि ते उत्तर होते मानवलोक संस्था अंबाजोगाई चे सर्वेसर्वा अनिकेत भैया लोहिया . लागलीच युथ क्लबचे सूर्यकांत जगताप यांनी अनिकेत भैया लोहिया यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि धारूर करांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि कुठल्याही विलंब न करता त्यांनी किल्लेधारुर युथ क्लबला साठ किराणा मालाचे किट दिले आणि त्यामुळे धारूर शहरांमधील कानाकोपऱ्यातील गोरगरीब, मजूर, शेतकरी गरीब, वृद्ध अशा प्रकारचे व्यक्ती होते ज्यांना गरज करता आली त्यांच्यासाठी ही मदत कायमस्वरूपी नव्हती परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून ती मदत देता आली वेळेचा कुठलाही विलंब न करता तातडीने आम्ही मागणी केली अनिकेत भैया यांनी ती पूर्ण केली आणि एका छोट्या संस्थेला मानवलोक सारख्या मोठया मनाच्या संस्थेने तात्काळ मदत केली नव्हे तर ते नेहमीप्रमाणे किल्लेधारुर युथ क्लब च्या मदतीला धावून आले ही सर्व किरणा मालाचे किट किल्लेधारुर युथ क्लबच्या सर्व सदस्यांनी यामध्ये सुरेश शिनगारे, अविनाश चिद्रवार ,सूर्यकांत जगताप,इजि. संतोष दुबे, प्रा नितीन शुक्ला , अभय चव्हाण ,गौतम भाऊ शेंडगे, अनिल तिवारी, विशाल दिखत, सचिन सक्राते,धनुभाऊ भावठणकर, गजानन दुबे, गायसमुद्रे रवी, दत्तात्रय गोरे, मुकेश शुक्ला, श्रीराम सिकची ,अशोक लोकरे, अमर औताडे , पवन धोत्रे, कपिल समर्थ, बनसोडे दत्ता आणि राजुशेठ गुन्नाल सर्वजणांनी उपस्थित राहून सलग तीन दिवस हे किराणा मालाचे सामान गरजूंपर्यंत पोहोच केले.








