मोबाईल चोरट्या पासून सावधान!

बीड/प्रतिनिधी
करोना सारख्या आपत्तीला लोक कंटाळले असून या आपत्तीचा कसाबसा सामना करताना दिसत आहेत परंतु याठिकाणी काही चोरटे लोकांना मानसिक त्रास दिल्याशिवाय देखील राहत नाही. शिथीलता वेळेत लोक आपल्या मूलभूत गरजासाठी लागणारे वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडले असता याठिकाणी लोकांना चोरट्यांचा देखील सामना करावा लागत असल्यामुळे लोकांची अता चीड-चीड वाढत असल्याचे पाहवयास मिळतआहे.
लाॅकडाउन झाल्यापासून मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येत आहे परंतु पोलिस प्रशासन देखील मोबाईल चोरट्याला धरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे व मध्ये अशाच मोबाईल चोर टोळीला पकडण्यात यश सुद्धा प्राप्त केला. परंतु पोलिस प्रशासनाने आजुन कठोर परिश्रम घेण्याची गरज भासत असल्याचे दिसून येत आहे.
लोक आज जेवणासाठी परेशान आहेत आणि अशा परिस्थितीत चोरटे त्यांना जास्त परेशान करत आहेत.कोरोना सारख्या आपत्ती मध्ये जर लोक आपली माणुसकी सोडुन मोबाईल चोरी करत असतील तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे.
पोलीस कर्मचारी अतिशय चांगली कामगिरी बजावत आहेत परंतु आता मोबाईल चोर टोळीला धरण्याची किंवा त्यांचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे.
शिथिलता वेळेत अवघ्या ३ ते ३:३०तासाच्या आत मध्ये खूप असे लोक बाहेर पळून आपल्या जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी करूण मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसते.परंतु जर गर्दी नसेल तर पोलिस कर्मचार्यांच्या लाठ्याकडे लक्ष असल्याने व आपल्या वस्तू कडे लक्ष नसल्याने देखील मोबाईल चोरट्याला प्रोत्साहन भेटत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी प्रशासनाने आता याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहेत कारण लोक पहिलेच खूप आपत्तीचा सामना करण्यासाठी
कंटाळलेले असून अता लोकांची चिडचीड वाढत आहे अशा परिस्थिती मोबाईल चोरीला जात असेल तर अजुन दुर्दैवाची गोष्ट आहे.








