धारूर पोलिसांनी ३८ दुचाकीवर कारवाई करून दंड केला वसूल

Dharur

धारूर/नाथा ढगे
धारूर येथील छत्रपती शिवाजी चौकात पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्या मार्गदर्शनाने शहरात विनाकारण फिरणाऱ्या , नियमांचे पालन नकरणाऱ्या, जीवन आवश्यक वस्तू  खरेदी करून त्या दुचाकीवरून नेण्यास बंदी आहे यावरून पोलीस प्रशासनाने शहरातील ३८ दुचाकीवर कारवाई केली यातून ७६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेखा धस , पोलीस कॉ शेख खमर पाशा, वखरे, रेंगे, मिसाळ, अर्जुन राठोड, होम गार्ड ढाकणे, मुंडे, गित्ते, आघव, माने, घोळवे यांनी केली यामुळे आता दुचाकीस्वारांना धाक बसणार आहे.

Sharing

Visitor Counter