कुलर विक्री व दुरुस्तीची परवानगी देणे अत्यावशक!

(बीड प्रसार न्युज)
कोरोनाच्या या वाढत्या प्रभावामुळे आज लोकांचे हाल होताना दिसत आहे शासनाने योग्य वेळी योग्य निर्णय घेताना दिसत आहे परंतु आज या कोरोनासारख्या आपत्तीचा लोक सामना करतानादेखील दिसते.या लाॅकडाउन मध्ये लोक घरीच असल्याने लोकांना गर्मी चा सामना करावा लागत आहे.
शासनाला वाढत्या तापमानाचा विचार करावा लागेल कारण
दुपारच्या वेळी लोकांना घरात खूप गरम होत असल्यामुळे लोक रोडवर दिसत आहेत.याचा मुख्य कारण म्हणजेच वाढता तापमान व गर्मी.कुलर विक्री व दुरुस्ती दुकाने बंद असल्याने अनेकांना तापमानाचा व गर्मीचा सामना करावा लागत आहे यामुळे लोकांची जास्तच चिडचिड पाहण्यास मिळत आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अत्यावश्यक सेवा देणारे दुकान उघडे राहतील असे आदेश दिले आहे परंतु या ठिकाणी आमनागरिक गर्मी व तापमानाचा सामना करताना दिसत आहे.
याचा विचार देखील जिल्हाधिकारी यांनी करायला पाहिजे. कूलर विक्री व दुरुस्ती हे अत्यावश्यक सेवेत या दुकानांना परवानगी देणे अशी चर्चा आमनागरिक करताना दिसत आहे.
बीड जिल्ह्यातील उन्हाळा आता सुरू झाला असून कूलर शिवाय उन्हाळा काढणे शक्य नाही त्यात यंदा कोरोनाने तोंड वर काढले आहेत वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञ ए.सी.आणि कुलर शक्य असल्यास टाळण्याचे आव्हान करत आहेत परंतु त्यांच्या आव्हानाला साथ देत बीड जिल्ह्याने मार्च महिना कसाबसा काढला परंतु आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमान वाढत आहे विशेषतः या आठवड्यात सूर्य देवतेने चाळिशीच्या या घरात प्रवेश केला आहे मधी मधी रात्रीला वादळ वारा येतो परंतु गर्मीने ना झोप होते ना माणसाची प्रकृती बरी राहते यामुळे माणसाची घरातच ज्यास्त चिडचिड वाढताना दिसत आहे.
* रमजानचा पवित्र महिना सुरु*
आजवरचा रेकॉर्ड पाहता पुढील काही दिवसात शहराचे तापमान अजूनच वाढणार आहे व पवित्र रमजान महिना देखील चालू होणार असून याठिकाणी लोक उपवास ठेवतील उपवासात लोकांचे वाढत्या तापमानामुळे हाल होऊ नये यासाठी कुलर चा लोक वापर करतील परंतु देशात लाॅकडाउन असल्याने लोकांनी मे महिन्यात कुलर खरेदी केलेली नाही.उपवासात जर त्यांना असच तापमान राहिला तर लोकांचे हाल होताना दिसेल पण जर कुलर चा वापर केला तर याठिकाणी लोक बाहेर न पडता कुलर समोर झोपतील.
* अत्यावश्यक सेवेत कुलर विक्री व दुरुस्तीची परवानगी देणे गरजेचे*
शहरातील मोठमोठ्या होलसेल कुलर विक्री करणाऱ्या दुकानदाराला अत्यावश्यक परवानगी देण्यात यावी कारण वाढत्या तापमानामुळे लोकांचे लाही-लाही होताना दिसत आहेत .
या लाॅकडाऊन मध्ये जे लोक विक्री करत आहेत त्यांचा लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून उन्हाळ्यात कुलर अत्यावश्यक असल्याकचे उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
खरेदी-विक्री सुरू झाल्यास नागरिकांची समस्या वाढणार नाही असे देखील जिल्हाधिकार्यांना या ठीकाणी होलसेल विक्रीते
करत आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी कूलर विक्री आणि दुरुस्ती दुकानांना परवानगी देणे गरजेचे आहे अशे होलसेल विक्रीते मध्ये चर्चा चालू आहे.








