निवारागृहातील ७० ऊसतोड कामगारांची सुटका, ४७ मजूर आदेश मिळण्याच्या प्रतिक्षेत

किल्ले धारूर/नाथा ढगे
उसतोडणी करून गावाकडे परतणाऱ्या ११७उसतोड मजूरांना धारूर येथे आडवून निवारागृहात ठेवण्यात आले होते . गत १९ दिवसापासून धारूर येथे निवारा गृहात ठेवण्यात आले होते . उसतोड कामगारांना त्यांच्या गावी सोडण्याचे आदेश आसतांना आद्याप त्यांना सोडण्यात आलेले नाही . जिल्हाधिकारी यांचे आल्याशिवाय त्यांना सोडता येत नव्हते . मंगळवारी हिंगोली व परभणी येथील कामगार सोडण्याचे आदेश मिळाल्यानंतर ७० मजूरांची सुटका करण्यात आली .
सांगली जिल्ह्यात ऊसतोड मजूरी करणाऱ्या ११७ उसतोड मजुरांना जिल्हाबंदीचे आदेशाचे उलंघन केल्याने पोलिसांनी २ एप्रिल रोजी धारूर अडवले होते. त्यांच्या वाहनावर गुन्हे नोंद करून संबंधित उसतोड मजुर कुटूंबियातील व्यक्तींना येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात निवासी ठेवण्यात आले होते. या मजूरांना गेल्या १९ दिवसांपासुन स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. लॉकडाऊन वाढत असुन प्रत्येकाला घराची ओढ लागलेली आहे. सुरुवातीला त्यांना १४ दिवसासाठी शिवारागृहात ठेवण्यात आले होते . मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने त्याचाही निवारागृहातील कालावधी वाढविला होता .
शासनाने सर्व उसतोड कामगारांना गावी पाठविण्याचे आदेश दिले आहेत . मात्र निवारा गृहातील मूजूरांना अद्याप सोडण्यात आलेले नव्हते . तहसिल प्रशासन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या प्रतिक्षेत होते . मंगळवारी सायंकाळी हिंगोली २४ व परभणीचे ४८ मजूरांना सोडण्याचे आदेश मिळाल्यानंतर ७० मजूरांना आपल्या गावी सोडण्यात आले . त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येवूनच प्रशासनाकडून सोडण्यात आले . मात्र यवतमाळ जिल्हयातील ४७ मजूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या प्रतिक्षेत








