धारूर तालुक्यात फळांचा राजा आंबा रुसला , 70 टक्के आणि उत्पादन घटले

किल्ले धारूर/नाथा ढगे
धारूर तालुक्यात यावर्षी फळांचा राजा आंबा रुसलेला आहे यावर्षी गावरान आंब्याचे उत्पादन 70 टक्क्यांनी घटले आहे ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी आंब्यांना मोहर आलेला आहे गावरान आंब्याची गोडी नागरिकांना महागात पडणार आहे
यावेळेला ग्रामीण भागातून धारूर शहरात गावरान आंबे मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतात परंतु यावर्षी यावर्षी धारूर करांना आंब्याची गोडी रस हा नीलम सारख्या सरकारी आंब्यावर भागवा लागणार आहे बदलत्या हवामानामुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झालेला आढळून येतोय.
यावर्षी जून महिन्यामध्ये हे पाऊस न पडल्याने पुरेसा गारवा निर्माण झाला नाही त्यामुळे आंबा पिकाला पोषक असणारी वातावरण निर्माण न झाल्याने उत्पादन घटल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे यामुळे मात्र आंब्याचा रस त्याची गोडी चाखायला मिळणार नाही धारूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आंबे पुणे मुंबई याठिकाणी पाठविले जातात परंतु यावर्षी उत्पादन घटल्याने ते पाठवता येणार नाहीत थोड्या फार प्रमाणात शहरात गावरानआंबा दाखल होईल मात्र त्याचे दर सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारे नसतील त्यामुळेच गावरान आंब्याचे गोडी अता महाग होणार हे निश्चीत आहे.








