धारूर येथील क्वारंटाईन केलेल्या 32 नागरिकांची सुटका
Beed

प्रतिनिधी/इरफान शेख
सांगली जिल्ह्यातून आलेल्या ऊस तोड मजूर कामगारांचे व त्यांच्या संपर्कातील धारूर तालुक्यातील खोडस येथील २९ व संगम येथील ३ असे एकूण ३२ नागरिकांची क्वारंटाईन कक्षातून प्रशासना कडून त्यांना आज २२ दिवसानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुटका करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण वाहीकेतून त्यांना घरी सोडण्यात आले यावेळी तहसीलदार व्हि.एस.शिडोळकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे , मुख्याधिकारी सुहास हजारे, डॉ. चेतन आदमाने पत्रकार सय्यद शाकेर , सुनील कावळे, सूर्यकांत जगताप, नाथा ढगे, शेख इरफान इत्यादी उपस्थित होेते घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
