जीवनावश्यक दुकाने विषम तारखेला चालू राहतील.
Ashti

आष्टी/तुकाराम गणगे
जीवनावश्यक दुकाने एप्रिल महिन्यातील १९, २१,२३,२५,२७,२९या विषम तारखेला संचारबंदी शिथिलथेच्या सकाळी ७ ते ९:३० या वेळेत चालू राहणार आहेत. नोंदणीकृत शेतकरी आपला उत्पादित भाजीपाला, फळे दारोदारी जाऊन दिवसभर सकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळेत विक्री करणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी. प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे अशी माहिती नायब तहसीलदार प्रदिप पांडूळे यांनी दिली आहे.








