मदत नव्हे तर कर्तव्य ! आ.संदीप भैय्या कडुन गरिबांना अन्नधान्य वाटप

बीड/प्रतिनिधी
सद्या कोरोना मुळे लावलेल्या लाॅकडाऊन मुळे सर्व भारत ठप्प झालेले आहे लहान ते मोठ्या सर्व व्यवसाय बंद झालेले आहे. लोकांनच्या हाताला कामे नाही हातावर पोट असणाऱ्या गरिबांवर तर अती व्हाईट परिस्थिती आलेली दिसत आहे.
अंतोदय व दारिद्रय़ रेषेखालील लोकांना राशन धान्य दुकानातून थोडेफार अन्नधान्य मिळालेली आहे पण हजारो असे गरिब कुटुंब आहे ज्यांच्या कडे अंतोदय व दारिद्रय़ेत त्यांचे नाव नाही अश्या गरिबांना घरातच उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे.
अश्या दहा हजार कुटुंबांना मदतीसाठी मदतगार महणून बीडचे आमदार संदिप भैया क्षीरसागर पुढे आले आहेत संदिप भैय्यानी आपल्या कार्यकर्ते मार्फत शहरातील पेठ बीड भागातील प्रकाश आंबेडकर नगर,बार्शीनाका ते मोमीनपुरा मिल्लत नगर पर्यंत मोफत धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी गरिबांनी आ.संदीप भैयाला भरभरुन आशिर्वाद दिले या वाटपाच्या वेळी मा.सभापती खुर्शीद आलम, नगरसेवक लक्ष्मण इटर. सुनिल महाकुंडे,मोमीन मसी,कुरेशी सत्तार,नजर खान,हमिद भाई,सौदागर एजाज, शे.नजर,इनामदार सततार,शे.ईमतयाज,रफिक कुरेशी,भिमा निंबाळकर,आदी उपस्थित होते.








