ज्ञानोबा गोतावळे कडून पञकारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

गेवराई/प्रतिनिधी
दिव्यांग मुले व निराधार व्यक्ती तसेच गरीबलोकांना ज्ञानोबा गोतावळे कडुन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकटकाळी प्रशासनाच्या खांद्याला -खांदा लावून लोकशाही चा चौथा स्तंभ आपली भूमिका खांभिरपणे मांडत आहे. पत्रकारिता करीत असताना वास्तविकता समोर आणण्यासाठी पत्रकारांना रस्त्यावर यावं लागते तसेच अनेकांच्या संपर्कात रहावे लागते त्यामुळे या क्षेत्रातील पत्रकार यांना जीवनावश्यक वस्तू अत्यंत गरजेचे असून पत्रकार यांचि दखल घेऊन पत्रकारांना ज्ञानेश जनकल्याण सेवाभावी संस्था बिड संचलित कै.केशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालय तलवाडा ता.गेवराई जि बिड संस्थेचे सचिव ज्ञानोबा गोतावळे नि विचार केला व तलवाडा येथील १५पञकारांना जीवनावश्यक वस्तू केल्या वाटप
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो कोरोना च्या या भयानक संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार बांधव आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन तलवाडा येथील मूकबधिर दिव्यांग शाळेचे सचिव ज्ञानोबा गोतावळे यांच्या कडून १५ पञकारांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून एक चांगला उपक्रम राबवुन त्यांच्या या कार्यबदल तलवाडा येथील ग्रामिण पञकार बांधवांनी ज्ञानोबा गोतावळे यांचे आभार माणुन त्यांचे धन्यवाद मानले.
ग्रामीण भागातील ज्ञानेश जनकल्याण सेवाभावी संस्था बीड संचलित कै. केशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालय तलवाडा या संस्थेचे सचिव ज्ञानोबा गोतावळे यांनी स्वखर्चाने औरंगाबाद येथील पालावरील ७० कुटुंब, गेवराई येथे ०७ निराधार कुटुंबातील व्यक्ती व तलवाडा येथील २५ दिव्यांग व निराधार कुटुंबातील लोकांना किराणा सामान आणि अन्नधान्य घरोघरी जाऊन वाटप केले आहे.








