कोरोणाच्या संचाबदीमुळे उपचार न मिळाल्याने दुभत्या गाईचा मृत्यू

Ashti

आष्टी/तुकाराम गणगे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाय योजना यशस्वी होत असताना दुर्दैवाने आष्टी तालुक्यातील पिंपळा गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला.  तालुक्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपळा गावच्या परिसरातील तीन किलोमीटरच्या अंतरावरील गावे क्वांवरटाईन झोन व त्यापुढील चार किलोमीटर अंतरावर असलेले गावे बुफ्फर झोन मध्ये विभागण्यात आले. त्याठिकाणी कलम १४४लागू करुन अनिश्चित काळासाठी संचारबंदी आहे. 

बुफ्फर झोन मध्ये समावेश असलेल्या गावांच्या यादीत कोयाळ गावाचा समावेश आहे. कोयाळ येथील अंबादास पवार हे शेतकरी दुग्धव्यवसाय करुन कुटुंबाची उपजिविका भागवतात. त्यांच्या दुभत्या गायीचं अचानक दुखू लागताच त्यांनी जवळच्या गावातील पशुवैद्यकीय डॉक्टरांना उपचारासाठी बोलविले परंतू गावोगावी ग्रामपंचायतच्या हद्दीत रस्ते खोदलेले असल्याने डॉक्टर पोहचू शकले नाहीत. उपचार न मिळाल्याने ऐंशी हजार रुपये किंमती गायीचा जागीच तडपडून मृत्यू झाला. 

शेतकऱ्याने तलाठी राठोड यांच्याशी मृत गायीचा पंचनामा करण्यासाठी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला पण राठोड यांनी कॉल उचलला नाही. त्यामुळे पंचनामा होऊ शकला नाही. 
एकत्र कुटुंब असूनही आम्ही सर्व दुग्धव्यवसाय करुन आमची उपजीविका भागवत होतो.  सध्याच्या बाजार भावानुसार ऐंशी हजार रुपये किंमतीची दुभती गाय उपचार न मिळाल्याने मृत पावली. त्यामुळे आमचे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. प्रशासनाने योग्य ती आर्थिक मदत करून आमच्या  जगण्याला पाठबळ द्यावे अशी मागणी शेतकरी अंबादास पवार यांनी केली आहे. 

अत्यावश्यक सेवा चालू असूनही केवळ कोरोनाच्या भीतीमुळे पशुवैद्यकीय डॉक्टर आले नसल्याची शंका शेतकरी सागर पवार यांनी बीड प्रसार न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

Sharing

Visitor Counter