२४ तास उभे राहून आपले कर्तव्या बजावत आहेत पोलिस कर्मचारी

Beed

बीड/सय्यद समीर
(बीड प्रसार न्युज)
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. बीड जिल्ह्यातही नुकताच एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आज कोरोनामुळे होणाऱ्या COVID-19 या रोगाचा प्रसार आपल्या गावात होण्यापासून रोखणे हे शक्य असून हे आपले आद्यकर्तव्य आहे.प्रशासन जिल्हा अधिकारी व पोलिस अधीक्षक यांचे काटेकोरपणे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज तयार आहे. 

बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. परंतु लोकांना प्रशासनाला मदत करावी लागेल.

सोशल डिस्टनिंगचे काटेकोरपणे पालन करणे जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या वेळेत संचारबंदीत शिथिलता च्या वेळेसच बाहेर निघुन जीवनावश्यक वस्तू खरेदी करा व गर्दी करणे टाळा.

आज आपली भुमिका पार पाडताना पोलिस कर्मचारी बार्शी नाका चौकत दिसले.अशीच भुमिका आम नागरीकांनी पार पाडली तर अपन कोरोना सारख्या आपत्तीला हरवून विजय प्राप्त करू

Sharing

Visitor Counter