राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहे. अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा करण्यासाठी स्वस्त भाव दुकानदारांना धान्य देण्यात आले आहे.
तरी अश्या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील काही स्वस्त भाव दुकानदार दुकान उघडत नाही, धान्य नियमाप्रमाणे न देता कमी प्रमाणात देतात, ई-पोस मशीनची पावती देत नाही, शासनमान्य रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतात, धान्य देत नाही, ग्राहकांची अडवणूक करतात, ग्राहांकासह अरेरावीची भाषा वापरतात अश्या तक्रारी प्राप्त झाले होते.
सदर तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी,बीड प्रकाश आघाव पाटील यांनी बीड तालुक्यातील एकूण पाच रास्त भाव दुकानांचे परवाने निलंबित केले आहे व सदर निलंबित दुकाने नजीकच्या चांगल्या दुकानास जोडण्याबाबत तहसीलदार, बीड यांना आदेशीत केले आहे.
निलंबित दुकाने खलील प्रमाणे
1. रमेश सीताराम गंगाधर - बीड-41
2. ज्ञानदेव कान्हू बांड - घोसापुरी
3. चंद्रकांत रामभाऊ फाटले - बीड-34
4. चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन - बीड-14
5. चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन - बीड-03








