डॉक्टर,परिचारिकांसाठी चारशे सेफ्टी सुट बीडच्या रोटरी परिवाराचा पुढाकार; आरोग्य यंत्रणेकडे केले सुपूर्द

बीड/प्रतिनिधी
कोरोना संसर्गापासून जनतेच्या बचावाकरिता तसेच उपचाराकरिता डॉक्टर, परिचारीका रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठीही विविध संघटना पुढाकार घेत असून बीड रोटरी परिवाराने चारशे सेफ्टी सुट उपलब्ध करुन दिले आहेत. याकरिता तत्कालीन अध्यक्ष रो.अक्षय शेटे, रो. अतुल संघानी, रो. आदेश नहार यांनी पुढाकार घेतला.
कोरोना संसर्गीत व संशयीत रुग्णांवर उपचार करतांना डॉक्टर्स व परिचारीकांनाही सुरक्षा गरजेची आहे.
याकरिता बीड येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत कर्मचार्यांसाठी चारशे सेफ्टी सुट रोटरी परिवाराच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. रोटरी परिवाराने 2017-18मध्ये काही निधी शिल्लक ठेवला होता. या शिल्लक निधीतून हे सेफ्टी सुट खरेदी करण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे हे सेफ्टी सुट सुपूर्द करण्यात आले आहेत.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बीडचे तत्कालीन अध्यक्ष रो.अक्षय शेटे, रोटरी क्लब बीड मिडटाऊन चे तत्कालीन अध्यक्ष रो.अतुल संघांनी सचिव रो.आदेश नहार, सध्याचे अध्यक्ष रो.उमाकांत थोरात, रो.डॉ.निलेश जगदाळे,रो.मदन काबरा, रोटरी क्लब बीड सिटी चे रो.ईश्वर मुथा, रोटरी क्लब बीड सेन्ट्रल चे रो.संदेश लोळगे,रो.रवी उबाळे इ. रोटेरिअन उपस्थित होते.
या प्रोजेक्ट साठी रोटरी जिल्हा 3132 चे डीजीई रो.हरीश मोटवानी, रो.सूर्यकांत महाजन,रो.वाय जनार्धन राव, रो.संतोष पवार,रो.मुकुंद कदम,रो.बबन शिंदे,रो.गणेश वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले.
