परजिल्ह्यातून आलेल्यांना वडवणी तालुक्यातील मजुरांना मिळाला निवारा

बीड, दि. 10, (जि. मा. का) कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी किंबहुना प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार बीड जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांची टीम विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून सर्व ती सूक्ष्म खबरदारी घेत आहोत.
प्रशासनामार्फत सतर्कतेच्या अनेक उपाययोजनांपैकी एक म्हणजे परजिल्ह्यात कार्यरत असलेल्या परंतु मूळ बीड जिल्ह्यातील असलेली प्रामुख्याने ऊसतोड मजुरांची तसेच नोकरदारांची तात्पुरत्या निवारा शेडमध्ये करण्यात आलेली व्यवस्था.
वडवणी तालुक्यात अशी व्यवस्था प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कोठारबन, जिल्हा परिषद शाळा, परडी आणि जिल्हा परिषद शाळा, उपळी येथे करण्यात आली आहे. आतापर्यंत या तात्पुरत्या निवारा शेडमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कोठारबन येथे 27 तर परडी माटेगाव येथे 5 आणि उपळी येथे 12 स्थलांतरीत आहेत. कोठरबन येथे पुण्याहून आलेली स्वतः च्या घरात क्वारंटाईन करून घेतलेली एक व्यक्ती आहे. गटविकास अधिकारी श्रीमती एम. एस. कांबळे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्या म्हणाल्या, सांगली आणि सातारा जिल्ह्यात हे ऊसतोड मजूर कामासाठी गेले होते. ते बीड जिल्ह्यात आल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची जिल्हा परिषद शाळा, परडी आणि जिल्हा परिषद शाळा, उपळी तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कोठारबन येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची राशनची सोय करण्यात आली आहे.
वडवणी तालुक्यातील कोठरबन गावातील 7 कुटुंबे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून कामास गेली होती. ती चिंचवण येथे आली, परंतु गावातील लोकांनी त्याना वस्तीवर घेण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर सरपंच सुधाकर मुंडे, त्यांच्या पत्नी कुशाबाई, उपसरपंच, ग्रामसेवक आदिंनी पुढाकार घेऊन त्यांची प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, चिंचवण येथे तपासणी करून घेतली. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या मोठ्या इमारतीत त्यांची निवास व्यवस्था केली. त्यांना वीज, पाणी यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. 14 दिवस बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या. त्यांचे ते पालन करतात.
कोठरबनच्या ग्रामसेविका मीरा चव्हाण म्हणाल्या, कोठरबन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे सहा - सहा तासांच्या ड्युटीवर 2 कर्मचारी नेमले आहेत. ते विलगीकरण कक्षातील व्यक्तीवर लक्ष ठेवून आहेत. त्याबरोबरच पंचायत समितीच्या वतीने 2 शिक्षकांचीही नेमणूक केली आहे. त्याशिवाय गावात एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक आदींचा समावेश आहे. सर्व समिती सदस्य दिवसातून एकदा उपकेंद्राला भेट देतात. संबंधितांची विचारपूस करून आवश्यक साहित्य पुरवठा केला जातो. ग्रामस्थही सहकार्याची भूमिका घेत आहेत. 1 मीटर अंतर राखणे, मास्क वापरणे, हात धुणे अशा सूचनांचे पालन ते करतात.
याबाबत कोठरबनचे शिवाजी डोंगरे म्हणाले, आम्ही सातारा जिल्ह्यात कोरेगाव येथे साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून कामास गेलो होतो. मजल दरमजल करत आम्ही येथे पोहोचलो. आम्ही गावी गेलो, परंतु आम्हाला वस्तीवर प्रवेश मिळाला नाही. त्यावेळी सरपंचांनी आम्हाला तपासणी करण्याचे सूचित केले. तसेच सरपंच यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांनी आम्हाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर निवास सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या वतीने किराणा राशन भरून देण्यात आले. पाणी, वीज व्यवस्था आहे. आम्ही येथे सुरक्षित आहोत.
ग्रामपंचायतीच्या वतीने आमची निवास व्यवस्था केली असून, किराणा, साबण, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केल्याचे सांगून, कोठरबनच्या अनिता अनिल जावळे म्हणाल्या, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दिलेल्या सूचनांचे आम्ही तंतोतंत पालन करत आहोत. आखून दिलेल्या लक्ष्मण रेखेच्या बाहेर जात नाही व कोणाला आत येऊ देत नाही.
परडी माटेगावमध्येही खबरदारी
परडी माटेगावचे सरपंच माधव शेंडगे म्हणाले, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आम्ही 2 विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातून आलेले ऊसतोड मजूर आणि पुणे जिल्ह्यातून आलेले खाजगी नोकरदार तरुण यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
परडी माटेगावचे ग्रामसेवक आर. ए. चौगुले म्हणाले, परजिल्ह्यातून, परगावहून आलेल्या लोकांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. या ठिकाणी सध्या 5 व्यक्ती आहेत. राशन, पाणी आदी सोयी दिल्या आहेत. त्यांची रोज विचारपूस केली जात असून, ते या ठिकाणी सुरक्षित आहेत.
विलगीकरण कक्षातील संतोष चव्हाण म्हणाले, मी पुण्यात नोकरी करत होतो. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असल्याने गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यानंतर माजलगाव येथील रुग्णालयात स्वतःहून तपासणी करून घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत आमची राहण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामपंचायत किराणा पुरवत आहे. या रोगावर लस उपलब्ध नाही, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांनी स्वतःची, कुटुंबाची व गावातील व्यक्तींची काळजी घेण्यासाठी विलगीकरण कक्षात राहावे, असे ते आवर्जून सांगतात.
त्यांचेच चुलतबंधु बालाजी चव्हाण म्हणाले, माझ्या घरी आई वडील, भाऊ वहिनी आहेत. मी पुणे जिल्ह्यातील निगडी येथे फायर इंजिनिअर म्हणून काम करतो. कोरोनामुळे गावी परतावे लागले. खबरदारी म्हणून प्रशासनामार्फत ते जिल्हा परिषद शाळेत केलेली व्यवस्था योग्य असल्याचे ते सांगतात.
परडीचेच नवनाथ भले हे पत्नी राधा व मुलगा कृष्णा यांच्यासह दिवाळीत सांगली जिल्ह्यात ऊसतोड मजूर म्हणून गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते परडी या त्यांच्या गावी परतले. तेव्हा सरपंच यांनी त्यांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्वतंत्र निवास व्यवस्थेत राहण्याबाबत सूचित केले. त्यानुसार ते जिल्हा परिषद शाळा परडी येथे तात्पुरत्या निवास व्यवस्थेत कुटुंबियांसह राहत असल्याचे नवनाथ भले यांनी सांगितले. त्यांचे वृद्ध आई वडील घरी राहत आहेत.
एकूणच कोरोनाच्या बाबतीत कोणतीच जोखीम स्वीकारायला प्रशासन धजावत
