बीड नगर परिषद प्रशासणाचा हलगर्जीपणा,नळाला दहा दिवस झाले तरी पाणी नाही

बीड नगर परिषद प्रशासणाचा हलगर्जीपणा,नळाला दहा दिवस झाले तरी पाणी नाही
बीड/प्रतिनिधी
(बीड प्रसार न्युज) कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाकळुन काटेकोरपणे उपयोजनाची अमलबजावणी होतांना दिसते परंतु नगर परिषद कुठे तरी कमी पडता दिसत आहे.
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून यंदा मार्च महिन्यात शहराचा टंचाई आराखडा तयार करुन वॉर्ड निहाय परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. शहरातील विविध भागात पाणी टंचाईची झळ नागरिकांना दिसत आहे. रस्ते,नाल्याना अधिक प्राध्यान्य दिले जात आहे. परंतू तात्पूरत्या नळ दुरुस्तीसह इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी कायम स्वरुपी पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासनाकडून चालढकल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.
बीड शहराला पाली या बिंदुसरा डाँम वरून पाणी पुरवठा केला जातो परंतु मागील काही दिवसा पासून शहरातील काही भागात दहा दिवसा पासून नळाला पाणीच आलेले नाही संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील काही भागातील नागरिकांनी संपर्क केला असता अधिकारी ही उडवा उडवीची उत्तरे देत आहेत शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. तर काही भागात अल्प पाणी येत आहे तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते.
बीड शहरातील काही भागातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिकांच्या पाणी टंचाईच्या नावाने ओरड सुरु आहे.








