जिल्हा अधिकार्यांनी संचार बंदी शिथिलतेची वेळ पुन्हा

Beed

बीड/प्रतिनिधी 
क्रोना विषाणू चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन बीड,अंबाजोगाई, परळी व माजलगाव या चार शहरांच्या व उर्वरित जिल्ह्याच्या हद्दीत सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणाऱ्या आस्थापना सम-विषम चालू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

सदरील कालावधीत एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे ते आरती विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन खालील प्रमाणे फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार शहरांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणाऱ्या अस्थापना कलम लागू राहतील व सदरील अस्थापना खालील प्रमाणे चालू राहील.

संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री करणाऱ्या स्थापना दिनांक ९,११ व १३/०४/२०२० या तारखेत सकाळी ७ वा.सकाळी ९.३० वाजेपर्यंत चालू राहतील या काळात शहरी भागांमध्ये छोटा हत्ती,पीकप.इत्यादी कोणत्याही स्वरूपात मालवाहतूक होणार नाही मालवाहतूक करणारे कोणतेही वाहन चालवता येणार नाही.
 
जीवनाश्यक वस्तू सह घाऊक वितरक (होलसेलर)यांची दुकाने दिनांक ९,११ व १३/०४/२०२० रोजी सकाळी ६ ते सकाळी १०.३० या काळात बंद राहतील आणि ते कोणत्याही प्रकारची मालवाहतूक करणार नाहीत.
 
सर्व वितरक व किरकोळ  विक्रेते पोलीस विभागाकडून पास वापरून सर्व किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक विक्रेते (होलसेलर) यांच्याकडून आवश्यक ते सामान दिनांक ०९/११व१३एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता ते सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त करून घ्यावे.

सवलती वगळता सर्वांसाठी इतर सर्व काळात संचारबंदी कायम राहील अशा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

Sharing

Visitor Counter