कोरोना ने बीड जिल्ह्यात खाते उघडले एकपाॅजीटीव

(बीड प्रसार न्युज) प्रशासनाला आतापर्यंत कोरोना जिल्ह्यात दाखल होऊन न देण्यास मोठे यश आले होते मात्र एकनाथा कुणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्याच्या सर्वत्र जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सीमा बंद केल्या तरी देखील बीड जिल्ह्यात कोरोना या रोग आणि अखेर प्रवेश केलाच त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आष्टी तालुक्यातील पिंपळा या गावात एक रुग्ण आढळून आला आहे यामुळे आष्टी सह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे
खबरदारी म्हणून आता जिल्ह्यात इतर ठिकाणी धोरणाचा प्रादुर्भाव होऊ नाही म्हणून कलम 144 नुसार पिंपळगाव परिसरातील तीन किलोमीटर कोंनटमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे पिंपळा,सुंबेवाडी,
धनगरवाडी,काकडवाडी,ढोबलसंगवी,खरडगव्हान असे एकूण सहा गावांना कोण टाइम झोन मध्ये जोडले आहे तर काँटेंत्मेंत झोनच्या पुढील चार किलोमीटर आंतर असलेल्या गावात बुफ्फर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात लोणी ,नांदूर,सोलापूर वाडी, कुंटेफल आणि कोयाळ पाच गावांचा समावेश असणार आहे. वरील सर्व गावे अनिश्चित कालावधी साठी पूर्ण वेळ बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील दोघे जण हे नगर येथे जमातीसाठी गेले होते,त्या दोघांनी 23 मार्च पासून नगरमध्ये एका मस्जिद मध्ये मुक्काम केला होता,मात्र चार दिवसांपूर्वी हे दोघे बीड जिल्ह्यात दाखल झाले,आरोग्य प्रशासनाने नगर येथूनच त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठवले होते,अखेर त्यातील एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अन्य एकाच अहवाल प्रतीक्षेत आहे,दरम्यान या दोघांच्या संपर्कात आलेल्या तीन जणांना बीडच्या जिल्हा रुग्णलयात दाखल केले असून त्यांचा स्वाब पाठवण्यात येणार आहे .
संबंधित माहिती डॉ अशोक थोरात यांच्या कडून मिळाली आहे आहे एकूणच आता बीड जिल्ह्याला देखील सतर्क राहण्याची गरज आहे








