लोकांनो आता तरी कोरोनाला गांभीर्याने घ्या

Beed

बीड दि.७ (बीड प्रसार न्यूज): जगभरात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असताना भारत वेळीच योग्य पावले उचलून ही महामारी रोखण्याचा दिशेने वाटचाल करत असताना संपुर्ण भारत लॉक डाउन केले आहे.

जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा जाणवू नये यासाठी सम विषम तारखेस ३तासाची खुली सूट दिली आहे.याव्यतिरिक्त फिरणाऱ्या रिकामटेकड्याना पोलिसांकडून चोप दिला जात आहे.

कोरोनासारख्या गंभीर आजाराला लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत,शहरात तसेच ग्रामीण भागात लोक विनाकारण रस्त्यावर येताना दिसत आहेत, एकीकडे पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग,महसूल प्रशासन,दिवस रात्र मेहनत घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे. वारंवार विनाकारण बाहेर न पडण्याची विनंती करीत आहे.

जनता प्रशासनाला योग्य प्रतिसाद देताना दिसून येत नाही,लॉकडाउनच्या काळात जनतेने प्रशासनाने वेळेवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

प्रशासन आपल्यासाठी रात्रंदिवस एक करून आपल्या सेवेत सज्ज उभे आहेत बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल लेखावर यांनी बार- बार जनतेला आवाहन करून देखील नियमांचा उल्लंघन होतो याचा कारणच हे की तुम्ही कोरोनाला अजुन गांभीर्याने घेतलेला नाही.कोरोना सारख्या महामारीला तुम्हाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.जर गांभीर्याने घेतले नाही तर एक वेळ अशी येईल तेव्हा आपल्याला कडेल गांभीर्या काय असतं.

आपण आपल्या घराच्या बाहेरच असतो लोकांच्या संपर्कात येतो कदाचित या कोरोना सारख्या माहामारीला तुम्ही बळी पडलात तर? जर का असा झाला तर विचार करा आपल्या मातीला येणारा सुद्धा नसेल,मातीला तर सोडा तुम्हाला बघणारा कुणी नसेल, तुमचं काय होईल?हे मायने नाही ठेवत पण तुमच्या मुलांचा तुमच्या कुटुंबाचा काय होईल याचा विचार केला का? आपल्याला करायचं काय फक्त घरी बसून राहायचं बस.

प्रशासनाने जे नियम लागू केलेत गर्दी करणे टाळा,घराच्या बाहेर निघू नका,गर्दीमध्ये मास्कचा वापरा, रोमालचा वापर करा, शक्यतो गर्दी करूच नका, जर खरंच अडचण असेल तरच घराबाहेर पडा,तुम्ही स्वतःला विचारा हे नियम तुम्ही पाळलेत का?

हे नियम कोणासाठी आहेत हे तुम्ही स्वतः विचार करून पहा.

तुम्हाला फक्त पोलिसांची लाटी मारताना दिसते मात्र यामागचे कारण कधी बघितले का?जे पोलिस प्रशासन आपल्यासाठी रात्रंदिवस उभी आहेत त्यांना कुटुंब नाही का ? हे कोणासाठी उभे आहेत? आतातरी डोळे उघडा कोरोना सारख्या महामारीला गांभीर्याने घ्या.

कारण आपल्या आजूबाजूचे जिल्हे औरंगाबाद,उस्मानाबाद लातूर,जालना,नगर हे कोरोना सारख्या आपत्तीला बळी पडलेले आहेत कोरोना आता जिल्ह्याला घेरून आहे ते कधी ही आपल्यावर हावी होऊ शकतो त्यासाठी अता आपल्याला सतर्कतेने राहण्याची गरज आहे.एक सोबत लडण्याची गरज आहे.

Sharing

Visitor Counter