मिरजगाव येथील डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग (पॉलीटेक्निक) कॉलेजला ए.आय.सी.टी.ई. दिल्लीची मान्यता प्राप्त

Ashti

मिरजगाव येथील डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग (पॉलीटेक्निक) कॉलेजला ए.आय.सी.टी.ई.  दिल्लीची मान्यता प्राप्त 

आष्टी/प्रतिनिधी 
बीड प्रसार न्युज

मिरजगाव येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संस्था संचलित राजेंद्र ज्योतिराम फुले  (पॉलीटेक्निक कॉलेज ) मिरजगाव ला All India Council for Technical Education (AICTE) Delhi, तसेच MSBTE, DTE (Mumbai) ची प्रथम वर्ष व थेट द्वितीया वर्ष डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग प्रवेशासाठी मान्यता प्राप्त झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष हुमे सोमनाथ बबन यांनी सांगितले आहे. पुढे माहिती सांगताना   अध्यक्ष हुमे सोमनाथ बबन  म्हणाले की जामखेड - कर्जत तालुका व परिसरातील विद्यार्थ्यामध्ये टेक्नीकल क्षेत्रात शैक्षणिक क्रांती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संस्था संचलित राजेंद्र ज्योतिराम फुले  (पॉलीटेक्निक कॉलेज ) मिरजगाव चालू केले आहे. इंजिनिअरिंग अभ्यास्क्रमासाठी पुणे, औरंगाबाद सारख्या विविध शहरामध्ये जावे लागत होते हीच बाब लक्षात घेवून डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलोजी (पॉलीटेक्निक कॉलेज ) ची स्थापना वर्ष २००९ मध्ये केली. त्यामध्ये विद्यार्थ्याना मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, अभ्यास्क्रमाच्या  प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली.
वर्ष २००९ पासून तालुका व परिसरातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्याचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम महाविद्यालयाने आजपर्यंत चालू ठेवलेले आहे. महाविद्यालयातून इंजिनीअर झालेले विद्यार्थी देश व विदेशातील  नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे त्यांच्या क्षेत्रातील उद्योग - व्यवसाय सुरु केलेलं आहेत.
        तरी वर्ष २०२०-२१ साठी  १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता व इतर शहरातील शिक्षणासाठी येणारा अवाढव्य खर्च पाहता आपल्या परिसरामध्येच अत्यंत अल्प खर्चात व सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, तसेच प्रवेशीत लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी शासकीय शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध आहे. महाविद्यालयाध्ये निसर्गरम्य वातावरणात सुसज्य इमारत ,अनुभवी प्राध्यापक वृंद, सुसज्य प्रयोगशाळा, उत्कृष्ट निकाल तसेच अनेक सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासा सोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे  म्हणाले . 
महाविद्यालयाचे प्राचार्य  यांनी आवाहन केले की इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.उपलब्ध इंजिनिअरिंग शाखा   १. मेकॅनिकल इंजिनिअरिग प्रवेश क्षमता ६०, २. सिव्हील इंजिनिअरिंगप्रवेश क्षमता ६०, ३. कॉम्पुटर इंजिनिअरिंग प्रवेश क्षमता ६० . ४.इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग ६०.               ५. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन ६० प्रवेश पात्रता प्रथम वर्षासाठी १० वी उत्तीर्ण. थेट द्वितीय वर्षासाठी १२ वी विज्ञान शाखा, आय.टी.आय. (२ वर्ष ), १२ वी (एम.सी.व्ही.सी.) उत्तीर्ण प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी संपर्क. ८६६९८२१९८६,९८९०३०२६०६,७२४९८१८५३४,७५०७८००८६३ संकेत स्थळ www. Rjpcollge. Org या वेबसाईटला भेट दया.

Sharing

Visitor Counter