आष्टी येथील डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग कॉलेजला एआयसीटीई दिल्लीची मान्यता- डाॕ.डी.बी.राऊत

आष्टी येथील डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग कॉलेजला एआयसीटीई दिल्लीची मान्यता- डाॕ.डी.बी.राऊत
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग ॲन्ड टेक्नॉलाजी पॉलीटेक्निक कॉलेजला All India Council for Technical Education (AICTE) Delhi, आणि MSBTE,DTE (मुंबई ) ची प्रथमवर्ष व थेट द्वितीयवर्ष डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग प्रवेशासाठी मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे प्रशासन अधिकारी डाॅ.डी.बी.राऊत यांनी दिली. पुढे बोलताना म्हणाले की,आष्टी तालुका व परिसरातील विद्यार्थ्यामध्ये टेक्नीकल क्षेत्रात शैक्षणिक क्रांती आणण्यासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी - गंगाईनगर येथे आनंद चॅरिटेबल संस्थेचे शैक्षणिक संकुल उभारले. आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्याना इंजिनिअरिंग अभ्यास्क्रमासाठी पुणे, औरंगाबादसारख्या या शहरामध्ये जावे लागत होते. यामुळे डिप्लोमा ईन इंजिनीअरिंग ॲन्ड टेक्नॉलाजीची (पॉलीटेक्निक कॉलेजची १० वर्षापुर्वी स्थापना केली. त्यामध्ये विद्यार्थ्याना मेकॅनिकल इंजिनिअरिंग,सिव्हील इंजिनिअरिंग,कॉम्पुटर इंजिनिअरिंग अभ्यास्क्रमाच्या प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली.२०१० पासून तालुका व परिसरातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्याचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे.महाविद्यालयातून इंजिनीअर झालेले विद्यार्थी देश व विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत.काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे त्यांच्या क्षेत्रातील उद्योग,व्यवसाय सुरु केलेले आहेत. २०२०- २०२१ साठी १० वी.आणि १२ वी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता व इतर शहरातील शिक्षणासाठी येणारा अवाढव्य खर्च पाहता आपल्या परिसरामध्येच अत्यंत अल्प खर्चात व सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा ,प्रवेशीत लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी शासकीय शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध आहे.महाविद्यालयाध्ये निसर्गरम्य वातावरणात सुसज्य इमारत ,अनुभवी प्राध्यापक वृंद, सुसज्य प्रयोगशाळा आदि सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.उपलब्ध इंजिनिअरिंग शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिग प्रवेश क्षमता ४५ विद्यार्थीं, सिव्हील इंजिनिअरिंगप्रवेश क्षमता ४५ विद्यार्थीं , कॉम्पुटर इंजिनिअरिंग प्रवेश क्षमता ४५ विद्यार्थीं , प्रवेश पात्रता प्रथम वर्षासाठी १० वी उत्तीर्ण.,थेट द्वितीय वर्षासाठी १२ वी विज्ञान शाखा, आय.टी.आय. (२ वर्ष ), १२ वी (एम.सी.व्ही.सी.) उत्तीर्ण प्रवेश प्रक्रियासाठी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य महेश झगडे व उपप्राचार्य संजय बोडखे यांनी केले आहे.








