मा.ना. श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात साजरा

Beed

मा.ना. श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा वाढदिवस 

बीड/प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री
मा.ना. श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा वाढदिवस लातुर जिल्ह्यामध्ये धनंजयजी मुंडेसाहेब यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे व लातुर जिल्ह्यातील तमाम चाहत्यांनी  विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला .
लातूर येथील कोरोना परस्थीती लक्षात घेऊन अनावश्यक खर्चाला कात्री लावून मातोश्री वृद्धाश्रम येथे जाऊन निराधार व वंचित अशा आजी आजोबांना गोड व रुचकर भोजन समारंभाचे आयोजन केले. येथे मास्क वाटप करण्यात आले. या वेळी बाबासाहेब कांबळे यांनी येथील आजी आजोबा यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले मुळात माझ्या नेता व माझे आधारवड असलेले धनंजय मुंडे साहेब यांना गोरगरीब जनता व उपेक्षित वंचित लोकांची जाण आहे.त्याचं नातं मातीशी जुळलेलं आहे.माझ्या नेत्याने आपल्या राजकीय व सामाजिक जिवनात सर्व सामान्य माणसाला नेहमीच आदर दिला म्हणून साहेब आज उच्च पदावर विराजमान झाले आहे.ज्यांनां कधिच आपल्या पदाचा गर्व झाला नाही, इतर आजी आजोबा यांनी सुद्धा यावेळी सहानुभूतीपूर्वक  आपले मन मोकळे केले.सदर कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण व भावनिक संप्पन झाला. यावेळी  सोशल डिसटनस चे पालन करून व आश्रम पुर्णतः हा सॅनेटराईज करत हा कार्यक्रम पार पडला .

Sharing

Visitor Counter