किल्ले धारूर शहरात रस्त्यावर मुरुमाची मलमपट्टी, धारूर करांना डांबरी रोड ची प्रतीक्षा

किल्ले धारूर शहरात रस्त्यावर मुरुमाची मलमपट्टी, धारूर करांना डांबरी रोड ची प्रतीक्षा
किल्ले धारूर/इरफान शेख
किल्ले धारूर शहरात सततच्या पावसामुळे मेन रोड तसेच शहरात मोठ्या प्रमाणत खड्डे पडले असून नगरपरिषद च्या वतिने लाल मुरुमाची मलमपट्टी करण्यात आली आहे
सततच्या पावसामुळे मेन रोड तसेच शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यात नगरपरिषद च्या वतीने मोठ्या(मुरूम) गोट्याची मलमपट्टी करण्यात आली असून ही मलमपट्टी नागरिकांसाठी घातक ठरत मेन रोड सह अन्य ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी नगरपरिषद गोटे मिश्रित मुरुम टाकला असून रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे किल्ले धारूर वासियाच्या वतीने मेन रोड च डांबरीकरण कधी होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे
रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे मेण रोड हा रहदारीचा तसेच बाजार चा रस्ता असल्यामुळे पादचाऱ्यांना तसेच मोटारसायकल धारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे बुजविण्यासाठी गोटे मिश्रत मुरुम टाकून तात्पूरती मलमपट्टी करण्यात आली आहे. जोराचा पाऊस झाल्यास या रस्त्यावरून चालण्यास अडथळा निर्माण होणार आहे हे निश्चित कायमस्वरुपी समस्या मार्गी लावण्याऐवजी खड्डे बुजविण्याचा फक्त देखावा केला जात आहे. मागच्या वर्षी ही असेच मलपट्टी करण्यात आली होती मात्र, पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. असे असताना पुन्हा नव्याने त्याच ठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेला गोटे मिश्रित मुरुम कसा टिकणार? असा प्रशन निर्माण झाला आहे.








