बीड जिल्ह्यात आणखी एका कोरोना रुग्णाचा बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू

Beed

आणखी एका कोरोना रुग्णाचा बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू

आतापर्यंत जिल्ह्यातील 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू 
काळजी घ्या सतर्कता बाळगा

बीड दि.19 बीड  जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाचा आज रविवारी दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरील रुग्ण गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.  गेल्या बारा तासांमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. बीड शहरातील एका 29 वर्षीय तरुणाचा औरंगाबाद येथे आज पहाटे मृत्यू झाल्यानंतर दुपारी जिल्हा रुग्णालयात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कळले आहे.

Sharing

Visitor Counter